आर्णी प्रेस क्लब एवजी आर्णी पत्रकारसंघ
दि.१५ ऑगस्ट रोजी नुकताच पार पडलेल्या बैठकीत महत्वाच्या निर्णय घेण्यात आला. प्रेस कल्ब चा नाव बदलवून नव्याने आर्णी पत्रकारसंघ असे संघटनेचा नाव देण्याचे बैठकीत ठरले.त्यामुळे यापुढे प्रेस क्लब एवजी आर्णी पत्रकारसंघ असेच संघटना नावाने ओळखल्या जाईल आर्णी पत्रकारसंघ च्या अध्यक्ष आबीद फानन, उपाध्यक्ष सचिन शिंदे तर सचिव पदी बबलू जाधव यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष सचिन शिंदे तर सचिव पदी बबलू जाधव यांनी नियुक्ती
|
आबीद फानन |
आबीद फानन यांची थोडक्यात ओळख
गेल्या अनेक वर्षा पासून लेखणीतून जनसामान्यांचे प्रश्न आक्रमक पणे मांडणारे पत्रकार म्हणुन आबीद फानन कडे पाहीले जाते. त्यांनी आता पर्यंत अनेक वृत्तपत्र काम केलं आहे.
जिल्हात विविध उपक्रम राबविण्यात यशस्वी झालेल्या आर्णी पत्रकारसंघ चा नाव पुढे येतो. प्रेस क्लब च्या माध्यमातून अनेक नागरिकांची समस्या सोडवण्यात आले आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांना यशस्वी होण्यासाठी हातभार लावणारी पत्रकारांची संघटना आर्णी प्रेस क्लबचं याच प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी आबीद फानन यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सचिन शिंदे आणि बबलू जाधव यांची सचिव पदी एकमताने निवड करण्यात आली.
|
सचिन शिंदे |
सचिन शिंदे बाबत थोडक्यात
दैनिक सकाळ मधून गावपातळी वरून सुरू केलेला प्रवास लेखणीच्या जोरावर थेट तालुक्या पातळीवर पोहचला सचिन शिंदे हे शिक्षक असून शेतकरी,शेतमजुर आणि नागरिकांची समस्या ते सातत्याने मांडतात.
आर्णी पत्रकारसंघ म्हणजे एक विचार, प्रेस क्लब च्या माध्यमातून शेतकरी,शेतमजुर,सामान्य नागरिक सह गरजू विद्यार्थ्यां यांचे प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने एक दशका पुर्वी या संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या वतीने कायम जनसामान्यांचे प्रश्न लेखणी च्या माध्यमातून शासन आणि प्रशासन दरबारी सातत्याने मांडण्यात येते, त्यामुळे संघटनेला अधिक महत्व प्राप्त झाला आहे.
|
बबलू जाधव |
रोखठोक बबलू जाधव
कायम अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उठवण्याचा आधी पासूनच छंद असल्याने बबलू जाधव लेखणीच्या माध्यमातून विविध विषयांना परखडपणे लिखाण करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आर्णी पत्रकारसंघ मधिल सदस्य यांची एक वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदी एकमताने निवड करण्याची परंपरा राहिली आहे. त्या अनुषंगाने दि.१५ ऑगस्ट रोजी येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यामध्ये एकमताने अध्यक्ष पदी आबीद फानन उपाध्यक्षपदी सचिन शिंदे आणि सचिवपदी बबलू जाधव यांची निवड करण्याचा ठरावा मांडण्यात आला. दरम्यान संघटनेचे माजी अध्यक्ष संदीप ढोले, हरिओम बघेल, संजय राठोड यांनी हो कार देत अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि सचिव यांची निवड करण्याचा ठरावा पास केला. दरम्यान या बैठकीत कोणत्याही नविन सदस्यांना संघटनेत प्रवेश देण्या बाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. अनेक जण इच्छुक होते मात्र त्यांना तूर्तास वेटिंगवर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response