मी पाहिलेला यवतमाळचा "सिंह"

मी पाहिलेला यवतमाळचा "सिंह"
जिल्हाधिकारी सिंह

देवानंद जाधव 98 81 139 126

महीनो महीने झालेत, तरीही 'कोरोना'चे सावट कायम आहे. कोरोना, कोरोना, कोरोना, ऐकुन-ऐकुन मानवी कानाचे भरीत होऊन पुरती वाट लागली आहे. जगभर कोरोना बाधीतांचा आकडा सातत्याने मोबाईलची बॅटरी फुगावी तसा फुगत चालला आहे. दररोज 'पाॅझिटिव्ह निगेटीव्ह' असा ऊन सावल्यांचा खेळ, सर्वत्र सुरू आहे. जगाच्या नकाशात शेतकरी आत्महत्या करणाऱ्यांचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याने आधीच आपले तोंड काळे करुन घेतले आहे. त्यातल्या त्यात कोरोनाच्या साडेसातीने जिल्ह्याला पछाडले आहे. समाजाच्या किंबहुना जनतेच्या जिवावर गाडी, माडी कमावणारे नेते जनता संकटात असताना मुग गीळुन बसले आहेत. अशा भयान अवस्थेत जिल्ह्याची प्रशासकीय धुरा आपल्या खांद्यावर असलेले कर्तव्यदक्ष जिल्हाधीकारी एम. देवेंदर सिंह यांनी अवघ्या प्रशासनासोबत कमालीचा समन्वय साधून कोरोना योद्धायांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

कोविड सेंटर मधील कोरोना बाधित रूग्णांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी

शिवाय समाजाप्रती आपले ऊत्तरदाईत्वाची जाणीव ठेवून स्वतः जीव गुदमरून जाईल अशी पि.पि.ई. किट परिधान करुन कोरोना केंद्रात जात आहे. कोरोना बाधीतांची प्रत्येक खाटेवर जाऊन, मायेच्या ममतेने विचारपूस करुन,त्यांना धीर देत आहे. सिंह यांच्या प्रशासकीय वाहनाच्या अंबर दिव्याच्या झळाळी मध्ये अवघा जिल्हा प्रकाशमान करण्याची शक्ती ज्यांच्या खुर्चीत आणि लेखनीत आहे. किंबहूना जिल्हा कचेरीमधुनच अवघा जिल्हा कवेत घेण्याची ज्यांची क्षमता आहे. तरीही ऊंटावरुन शेळ्या न हाकता, प्रत्यक्ष फिल्ड वर जाऊन कर्तव्य बजावत आहे.

महागांव येथील कोविड सेंटर मधील आढावा घेताना जिल्हाधिकारी

जिल्ह्याच्या निर्मिती पासुन असा जिल्हाधीकारी पाहीला नाही अशी जिल्हाभरातील जनतेची भावना आहे. फक्त स्वतःचा विचार करणारे लोकं फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, मात्र जे सगळयांचा विचार करतात. त्यांची प्रगती कायम होत राहते. हा मौलीक विचार त्यांनी प्रशासनामध्ये पेरला आहे. जिल्हाधीकारी 'सिंह' यांनी कोरोना बाधीतांना आयुष्यात कधी ढासळू नका, कधी उध्वस्त होऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे असा वडीलकीचा धिर दिला. 

शिवाय कुण्या एका व्यक्तीचं पाच मिनिटात अचुक वैद्यकीय भविष्य वर्तवणारे यंत्र, तंत्र, आणि शास्त्र या जगात कुठेही ऊपलब्ध नाही ,मात्र कौशल्य, तर्क, आणि अनुभव वापरून एखादी अनुचित घटना घडण्याआधी ऊपाय योजना करणाऱ्या डाॅक्टरांनाही काही मानवी मर्यादा असतात, सदा सर्वदा ते बिनचुक असुच शकत नाही. त्यामुळे लोकांनी डाॅक्टरांना देवही समजु नये आणि गुन्हेगारही. हा स्वामी विवेकानंदांचा विचार जनते समोर ठेवला, व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.अतुट आत्मीयतेच्या विलोभनीय धाग्यांनी आपल्या सर्वांची मनं एका धाग्यात ओवणारा मि पाहिलेला "सिंह"अर्थात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आपल्या समोर ठेवलाय. भावी जीवनातील आरोग्य आणि सुख संपदेसाठी त्यांना आभाळभर शुभेच्छा.! 

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने