दोन वर्षा नंतर घटनेची पुनरावृत्ती
मृतक तथा कुख्यात गुंड देविदास चव्हाण यांनी दिपक उर्फ भैय्या यादव यांच्या वर दोन वर्षा आधी भर दिवसा हल्ला केला होता.विशेष म्हणजे ज्या ठिकाणी देविदास चव्हाण यांची हत्या झाली.त्याच ठिकाणी मृतक देविदास यांनी भैय्या यादव वर धारदार शस्त्राने हल्ला केला होता.
आरोपी दिपक उर्फ भैय्या यादवअटक करण्यात आलेल्या आरोपींची मध्ये सिध्दार्थ वानखडे, दिपक उर्फ भैय्या यादव, सिध्दार्थ रावेकर आणि अजय वासनिक अशी त्यांची नावे आहेत. घटनेतील आरोपींनी संगनमत करून मृतक व कुख्यात गुंड देविदास चव्हाण यांचा गळा चिरून भर दिवसा खुन करून आरोपी फरार झाले होते. दरम्यान या घटनेची फिर्याद तथा प्रत्यक्षदर्शी उद्योग नगर लोहारा येथील शरद बेंद्र यांनी पोलिसात दिली आहे.

आरोपी सिध्दार्थ वानखडे
मृतक देविदास चव्हाण चा भाऊ कारागृहात
मृतक देविदास चव्हाण चा भाऊ दुर्गेश चव्हाण याने जानेवारी महिन्यात खून केल्याचा आरोप त्यांच्या वर असल्याने तो सध्या कारागृहात आहेत.त्यामुळे हा प्रकरण भडकणार अशी चर्चा शहरात सुरू आहे.
आरोपी अजय वासनिक
पोलिसात तक्रार दिल्यानंतर काही आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. पोलीसांनी सर्वात आधी दिपक उर्फ भैय्या यादव यांना अटक केली. यादवने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिल्या नंतर उर्वरित तीन आरोपींना लासीना येथून अटक करण्यात आली. सिध्दार्थ वानखडे, सिध्दार्थ रावेकर आणि अजय वासनिक या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेली चार चाकी वाहन जप्त करण्यात आली आहे.