'जिल्ह्यात पहिल्यांदाच पाच जणांचा मृत्यू'

'जिल्ह्यात पहिल्यांदाच पाच जणांचा मृत्यू'


८० जण नव्याने पॉझिटीव्ह तर २६ जणांना सुट्टी 
यवतमाळ : जिल्ह्यात गत एकाच दिवसात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युंची एकूण संख्या ७५ झाली आहे. तर ८० नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्ह्यात भर पडली आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या २६ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

"कोरोनावर मात करून देशाला हातभार लावू या"
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुभाव लक्षात घेता नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग सह गर्दीत जाणं टाळण्याची आवश्यकता आहे. सध्या कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. अशा प्रस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी स्वतःची काळजी स्वतःच घेवून सरकार आणि प्रशासनाला मदत करून देशाला संकटातून बाहेर काढण्याचे कार्य नागरिकच करू शकतात. एम.डी.सिंह, जिल्हाधिकारी 

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६५ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, २९ वर्षीय पुरुष, ७५ वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील ५१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या ८० जणांमध्ये ५२ पुरुष व २८ महिला आहेत. यवतमाळ शहरातील पाच पुरुष व सहा महिला, कळंब शहरातील एक महिला, कळंब तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील १५ पुरुष व आठ महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, पुसद शहरातील १२ पुरुष व सात महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष, घाटंजी शहरातील एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, वणी तालुक्यातील नऊ पुरुष व दोन महिला, दिग्रस तालुक्यातील एक पुरुष, नेर तालुक्यातील दोन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुरुवारी १२९ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ४५६५६ नमुने पाठविले असून यापैकी ४४१७७ प्राप्त तर १४७९ अप्राप्त आहेत. तसेच ४११७८ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ६५४ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर २८० जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २९९९ झाली आहे. यापैकी १९९० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ७५ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १८१ जण भरती आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने