अरूणावती नदीला २०१८ मध्ये आलेल्या पुरा मुळे शहरात शिरले होते पाणी
अरूणावती नदीअरूणावती पाटबंधारे विभागाने सतर्क राहण्याचा दिला इशारायवतमाळ जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकांचा धरण म्हणजे अरूणावती प्रकल्प असून सतत पडणाऱ्या पावसामुळे अरूणावती प्रकल्पात पाणी साठा झपाट्याने वाढत असल्याने नदीच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागा कडून देण्यात आला आहे.
आर्णीला सर्वात जास्त धोका
दोन वर्षा आधी अतिवृष्टी झाल्यामुळे अरूणावती नदीच्या पात्रातून पाणी सोडण्यात आल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते.परिनामी शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
अरूणावती प्रकल्पात सध्याच्या घडीला ७५ टक्के पाणी साठी आहे.त्यामुळे दि. ३१ ऑगस्ट पर्यंत धरणात ८४ टक्के जलसाठा होऊ शकते.त्या अनुषंगाने काही दिवासात अतिवृष्टी झाल्यास अरूणावती प्रकल्पातून उर्वरित पाणी अरूणावती नदीच्या पात्रातून सोडावे लागणार आहे. ८४ टक्के पेक्षा जलसाठा झाल्यास उर्वरित पाणी नदीच्या माध्यमातून कधीही सोडावे लागणार असल्याने पाटबंधारे विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
"या गावातील नागरिकांना दिला इशारा"
दिग्रस तालुक्यातील गावे चिरकुटा, सावंगा(खुर्द) बेलुरा, लाख, जोगलदरी, वाई मेंढी, लोणी, नेताजी नगर आर्णी तालुक्यातील गावे सायखेडा, लिंगी,कोपरा, चिकणी, भंडारी, काठोडा, रूद्रापूर, मनपूर, आसरा, विठोली, यरमल, येडसी, भंडारी, शिवर आणि पळशी या गावांना पाटबंधारे विभागा कडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.


