Breaking

Post Top Ad

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

शेट्टींच्या स्वाभिमानीचा "सुधीर कथले" आता बाळासाहेबांच्या वंचितचा शिलेदार

शेट्टींच्या स्वाभिमानीचा  "सुधीर कथले" आता बाळासाहेबांच्या वंचितचा शिलेदार
प्रवेश करताना
बीड,दि.६ - वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालय या ठिकाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक आणि लढाऊ नेते सुधीर कथले यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाला सर्वोच्च मानत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. 

बीड जिल्ह्याचे कृतिशील जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्या कृतिशीलतेवर  विश्वास ठेवात वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचा झेंडा खाली ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या संघर्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला. "यापुढे जो संघर्ष आजपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी केला तो संघर्ष येणाऱ्या काळामध्ये वंचितांसाठी करणार असून, अनेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. अशी माहिती सुधीर कथले यांनी दिली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad