Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

'या शिवसैनिकाने जागवल्या अयोध्येतील आठवणी'

'या शिवसैनिकाने जागवल्या अयोध्येतील आठवणी'

आज अनेक वर्षा नंतर अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ५ ऑगस्ट ला करणार आहे. त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हातील शिवसेनेचे पहिले आमदार आणि कारसेवेत सामील झालेले श्रीकांत ऊर्फ बाळासाहेब मुनगिनवार यांनी अयोध्येतील २८ वर्षा आधी बाबरीचा ढाच्या पाडल्या त्या आठवणी त्यांनी सोशल मिडीया वर शेअर केल्या आहेत. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यात नाही, मात्र त्यांचे शिवसैनिक गर्वाने सांगताय की, होय आमचे शिवसैनिक बाबरी चा ढाच्या पाडण्यात सर्वात पुढे होते. चार वर्षा आधी त्यांच्या वर सुरू असलेले खटले बंद झाले. त्यामुळे शिवसेनेचा योगदान श्रीराम मंदिरासाठी किती मोठ्या प्रमाणात आहे हे विसरून चालणार नाही.

मी शिवसैनिक कारसेवेत गेलो होतो,त्याचा मला सार्थ अभिमान आहे.माझे सोबत यवतमाळ-आर्णी तालुक्यातील बेचाळीस शिवसैनिक  विश्व हिंदू परिषदेत आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केल्या नंतर विश्व हिंदु परिषद त्यांच्या मार्गदर्शनात दि.६ डिसेंबरला दिड लाख रामभक्त कारसेवेला सज्ज होतो. बाबरी ढाच्यावर आम्ही चार शिवसैनिक सब्बल घेऊन शिस्तबद्धतेने न थकता बाबरी ढाचा ध्वस्त करित असतांना मंचावरुनप्रोत्साहन दिल्या जात होते,एक धक्का और दो...बच्चा बच्चा राम का जन्मभुमीके काम का...जय श्रीराम..जय जय श्रीराम.!

आम्हीपण जोशात "जय भवानी जय शिवाजी" नारे लावलेत.महाराष्ट्रातुन खुप संख्येनी मराठी मुलांनी मोठा प्रतीसाद दिला ती आठवण विसरणे शक्यच नाही. अंगाला जखमा झाल्यात पण सर्वच जण बाबराला मारत असल्यासारखे घुमटावर भिडले. ढाचा पाडल्यावर रामभक्त जल्लोश करित होते. साघ्वी ऋतुंबरांच्या कौशल्याची दाद द्यायला पाहिजे, मलबा हटवायचा कसा, त्यांनी आवाहन केले "हर कोई रामभक्त दो ईटे ले जाय..बाबर को पैरो तले रैगता देखना है..अपने पैखाने मे दो ईटे लगाए",सर्व रामभक्तांनी दोन दोन विटा आणल्या,बाराणे मलबा हटला.पाचशे वर्षापासुनचा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा कलंक मिटला.

त्यावेळी अशोकजी सिंघल, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, प्रविण तोगडिया, उमा भारती, वंदनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,पंतप्रधान नरसिंहराव ,मुख्यमंत्री कल्याणसिंग, साघ्वी ऋतुंबरा या सारख्या अनेक मंडळींनी,रामजन्मभुमी न्यास,साधूसंत झटल्यानेच शक्य झाले. बाबरी ढाचा माझ्या शिवसैनिकानी पाडला असेल तर त्याचा मला अभिमान आहे,असे त्यावेळी ठासुन सांगणारे शिवसेनाप्रमुखच होते.

मा.पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या आवाहनावर अयोध्येला होतो,"पहिले मंदिर फिर सरकार" घोषणा देत अयोध्या सजली होती,जोश होता जल्लोष होता. विश्वहिंदू परिषदेने मंदिर निर्माणाचे सर्व साहित्य अयोध्येत  त्यावेळीच देशभरातुन जमा केले होते,कोरिव स्तंभ मनमोहक आहे अन सुरक्षित आहे.मा.पंतप्रधानांच्या हस्ते दि. ५ ऑगस्ट ला भुमीपुजन होत आहे.केवळ २५० मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा होत आहे.आनंदच आहे,घरून सोहळा बघू,कोरोना संकटानंतर अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर कामी आठ दिवस कारसेवा करुया अनेक शिवसैनिक व रामभक्तांसोबत.कोरोना संकटानंतर जर सोहळा झाला असता तर हजारो कारसेवक व लाखो रामभक्त आले असते,आम्हासही ते भाग्य लाभले असते एव्हढेच. 
जय श्रीराम.!
जय भवानी जय शिवराय.!
जय महाराष्ट्र.!
श्रीकांत उर्फ बाळासाहेब मुनगिनवार,शिवसेना माजी आमदार तथा माजी जिल्हाप्रमुख यवतमाळ ९६०४२६५७१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad