Breaking

Post Top Ad

बुधवार, २९ जुलै, २०२०

'बुधवारी कोरोना बाधितांची संख्या एवढी वाढली'

बुधवारी  कोरोना बाधितांची संख्या एवढी वाढली
यवतमाळ : जिल्ह्यात बुधवारी एका कारोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या २७ झाली आहे. तर आज नव्याने ४६ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले २६ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

आज (दि. २९) बुधवार ला मृत झालेल्यामध्ये उमरखेड तालुक्यातील खरूज येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर जिल्ह्यात नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ४६ जणांमध्ये ३० पुरुष व १६ महिला आहे. यात दिग्रस शहरातील १३ पुरुष व पाच महिला, दिग्रस शहरातील संभाजी नगर येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील १० पुरुष व आठ महिला, झरी जामणी शहरातील तीन पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष व दोन महिला, दारव्हा येथील अंबिका नगर येथील एक महिला आणि नेर शहरातील दोन पुरुष यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात दि. २८ पर्यंत ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३२४ होती. यात आज ४७ नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ३७१ वर पोहचला. मात्र एका जणाचा मृत्यु व 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या २६ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३४४ आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे ३१० तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले ३४ जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ८९९ झाली आहे. यापैकी ५२८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २७ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ८२ जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी १०० नमुने तपासणीकरीता पाठविले. महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत १५१९६ नमुने पाठविले असून यापैकी १२८७४ प्राप्त तर २३२२ अप्राप्त आहेत. तसेच ११९७५ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad