राळेगाव च्या कोदुर्ली गावात हळहळ
काळाच्या पोटात काय दडलयं, हे कोणालाही सांगता येत नाही. अगदी पारंगत पंडीतालाही कळत नसतं. यवतमाळ जिल्हातील राळेगांव तालुक्यातील कोदुर्ली या गावात आई आणि वडील रोजमजूरी साठी शेत शिवारात गेल्या नंतर भूसेवार परिवारावर अशाच एका बेसावध क्षणी काळाने घात केला आणि क्षण भरात तीन भावाचा जागीच जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली.
कुलर चा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा करून अंत झाल्याची घटना यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली गावात घडली आहे. आज (दि.३० ) सकाळी साडे नऊ वाजता च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मृतक च्या आईला मिळाल्या नंतर त्या माऊलीने आभाळ चिरत जाईल असा हंबरडा फोडला अन् गावात सगळीकडे शुकशुकाट पसरला.
रिया गजानन भुसेवार वय ८ वर्ष, संचिता गजानन भुसेवार वय ६ वर्ष, मोनिता गजानन भुसेवार वय ४ वर्ष अशी मृत बहिणींची नावे आहेत. मृतक मुलींची आई निंदण कामाकरिता व वडील फवारणी करीता शेतात गेलें होते.
दरम्यान घरी तिघे बहिणी एकत्र जेवण्यासाठी बसल्या नंतर त्यावेळी कुलर सुरु करण्यासाठी मोठी बहीण रिया गेली असता तिला कुलरमधून विजेचा शॉक बसला, रिया ला वाचविण्यासाठी पाठोपाठ मोनीता व संचिता गेल्या त्यांनाही विजेचा धक्का बसल्याने त्या फेकल्या गेल्या यात दुर्दैवाने तिघींचाही करुण अंत झाला. घराशेजारी राहणाऱ्या महिलेला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांना घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.