ज्वलंत हिंदुत्वाचा प्रश्नांवर आक्रमक लडणारी संघटना म्हणुन नावारूपास आलेल्या शिवसेनेनी न्यायालयाने निकाल दिल्या नंतर लगेच राम मंदिर उभारण्यास वर्गणी दिली आहे. राम मंदिर अयोध्येत व्हावे अशी ईच्छा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक नव्हे तर तीन वेळा अयोध्येत जावून 'रामलला'चे दर्शन घेतले आहे. त्याच बरोबर शिवसेने कडून सर्वात आधी राम मंदिर उभारण्यासाठी वर्गणी सुध्दा देण्यात आल्याची माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे.
Post Top Ad
सोमवार, २० जुलै, २०२०
'पंतप्रधान मोदी करणार ४० किलो चांदीचा शिळा अर्पण'
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमी पूजनासाठी ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. ट्रस्टी नृत्यगोपाल दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूमी पूजनात सहभागी होण्यासाठी विनंती केली होती. त्या अनुषंगाने राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान कार्यालयाला ३ आणि ५ ऑगस्ट अशा दोन तारखा पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैंकी पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राम मंदिराच्या भूमी पूजनात सहभागी होणार आहेत. शनिवारी सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत चंपत राय यांच्याशिवाय अप्पर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी, कामेश्वर चौपाल, नृत्यगोपाल दास, गोविंद देव गिरी महाराज आणि दिनेंद्र दास यांच्यासहीत इतरही ट्रस्टी उपस्थित होते.
शिवसेनेनी राम मंदिरासाठी सर्वात आधी दिली वर्गणी
अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनाची तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. श्रीराम जन्मभभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत वृत्यगोपाल दास मणिरामदास छावनीच्या वतीने ४० किलो चांदीची शिळा श्रीरामांना समर्पित करणार आहेत. अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी आयोजित करण्यात आलेल्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी वैदिक मंत्रोच्चारासहीत ही शिळा स्थापन करणार आहेत.
राम मंदिराच्या उभारणीसाटी देशातील प्रत्येक राम भक्ताकडून काही ना काही समर्पित केल्या जात आहे. १९८९ साली काही जणांनी एक शिळा आणि सव्वा रुपयाचं दान मंदिरासाठी दिलं होतं. यासोबतच अनेक जणांनी आपल्याला शक्य असेल तेवढा मदतनिधी दिला आहे. मी न्यासाचा अध्यक्ष राहिलो आहे तसंच सध्या श्री रामजन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा अध्यक्षही आहे. त्यामुळे या महायज्ञात आपल्या वतीनं समर्पण करण्याची जबाबदारी आम्ही या शिळेच्या स्वरुपात पार पाडत आहोत, असंही नृत्य गोपाल दास महाराज यांनी म्हटले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response