Breaking

Post Top Ad

रविवार, १९ जुलै, २०२०

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार

प्रभू श्रीराम यांची जन्म ठिकाण असलेल्या अयोध्या येथे राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख केंद्र सरकार कडून निश्चित झाल्यानंतर भूमिपूजन सोहळ्याच्या तयारी ला वेग आला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार का अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

पहिले मंदिर फिर सरकार असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जावून शरयू नदीच्या काठावर महाआरती केली होती. त्यामुळे अयोध्येतील नागरिकांनी बालासाहेब का बेटा आया है असे म्हणत जोरदार स्वागत केले होते. त्या नंतर दुसऱ्यांदा खासदार आणि आमदार यांना घेवून उद्धव ठाकरे अयोध्येत गेले होते. शिवसेना आणि राम मंदिर हा मुद्दा देश वाशीयांना माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाण्याची दाट शक्यता आहे.
राम मंदिर उभारणी बाबत शिवसेनेची आग्रही भूमिका राहीली होती. त्या अनुषंगाने राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा आमंत्रण उद्धव ठाकरे यांना देणार का? अशा प्रश्न आता चर्चेला जात आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्यास सर्वोच्च न्यायालयान हिरवा कंदील दाखवल्या नंतर आता अयोध्येत मंदिर उभारण्याच्या तयारीला वेग आला आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजन येत्या ५ ऑगस्ट रोजी करणार असल्याचे जाहीर झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजन होणार संपन्न होणार आहे. कोरोना मुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असून मंदिर निर्माणासाठी प्रत्यक्ष  अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या संघटना व राजकीय पक्षाच्या लोकांना या सोहळ्याचा निमंत्रण दिले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मध्ये शिवसेनेचे नाव आघाडी वर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला जाणार का अशी चर्चा सुरू आहे.

शिवसेनेनी राम मंदिर उभारणी साठी पाच कोटी सर्वात आधी दिले
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत याबाबत भूमिका मांडली असून 'भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण येईल किंवा नाही हे आम्हाला माहित नाही. तो काही आमच्या साठी मानापनाचा विषय नाही. कारण आमचं नातं थेट श्रीरामाशी जोडलेलं आहे. त्यामुळे निमंत्रण आलं तर आनंदच होईल. आयोजकांनी निमंत्रण दिल्यास भूमिपूजन सोहळ्याला कोणी जायचं ते मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेतील'. प्रभू रामचंद्र हा श्रेद्धेचा विषय आहे. त्याला राजकारणाचा रंग देण्याची गरज नाही. परंतू राम मंदिराच्या निर्मितीसाठी पाया रचण्याचं काम सर्वात आधी शिवसेनेनं केले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्या आधी आणि नंतरही अयोध्येला जावून आले आहे. राम मंदिराच्या उभारणी साठी पाच कोटींची देणगी शिवसेनेनी सर्वात आधी दिल्याचे सावंत यांनी एका न्यूज चॅनलशी बोलतांना म्हटले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad