सध्या देशासह राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशात जिल्हा प्रशासनाने दि. १४ जुलै रोजी व्यवसायिक आणि नागरिकांना वेळेची मर्यादा ठेवून गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने काही नवीन नियम जाहीर केले आहेत.
दरम्यान जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कोरोना रूग्णांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हात वेळेत बदल करून जिल्हा बाहेरील अथवा आतील लोकांना जिल्हा बाहेर प्रवेश न देण्याचे कडक निर्देश दिले आहे. त्यातच जिल्हात तंबाखूजन्य वस्तू सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती वर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
खर्रा-तंबाखू खावून थुंकणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, शासकीय आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई होत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या रडारड वर खर्रा शौकीन असून आता पर्यंत लाखो रूपयांचा दंड खर्रा शौकीनां कडून वसूल करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्हात मजा चा खर्रा खाण्याची सवय अनेकांना आहे. अलीकडेच खर्रा बनवणाऱ्या व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने जिल्हात मोठा गोंधळ उडाला होता. त्या अनुषंगाने साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खर्रा खावून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती वर कडक कारवाई करून त्यांच्या कडून दोन हजार रूपये दंड करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे तुम्ही खर्रा खावून सार्वजनिक ठिकाणी थुंकत असाल तर तुम्हाला थुंकणे महागात पडू शकतो.
