Breaking

Post Top Ad

बुधवार, २२ जुलै, २०२०

पालकमंत्री संजय राठोड कडून एक कोटी रूपये मंजूर

पालकमंत्री संजय राठोड कडून एक कोटी रूपये मंजूर

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातसुद्धा या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पॉझिटीव्ह लोकांच्या हाय रिस्क व लो रिस्क संपर्कातील नागरिकांच्या चाचण्या करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळा (व्ही.आर.डी.एल.) व ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे चाचण्या करण्यात येत आहेत.

 याची गती आणखी वाढविण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी १६ हजार किट खरेदी करण्यासाठी १ कोटी रुपये मंजूर केले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय यंत्रणेच्या वतीने नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यासाठी 1 हजार याप्रमाणे १६ हजार ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे आता नागरिकांची तपासणी करण्यात येईल, त्यामुळे पॉझिटीव्ह नागरिकांचा शोध घेण्यास मदत होणार आहे.

नागरिकांनी स्वतःहून तपासणीसाठी समोर यावे; पालकमंत्री राठोड 
सध्याच्या परिस्थितीत काहीही लक्षणे असल्यास नागरिक स्वत:हून समोर येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र ही बाब स्वत:च्या व इतरांच्या जिवावर बेतू शकते, त्यामुळे नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा आजार, सारी किंवा आय.एल.आय. यासारखी लक्षणे असल्यास स्वत:हून समोर येवून आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी. तसेच जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी फीवर क्लीनिक मध्ये आपले नाव नोंदवून कोविड केअर सेंटर मध्ये तपासणी करून घ्यावी. रिपोर्ट निगेटीव्ह आला तर कोविड केअर सेंटर मध्ये भर्ती  राहण्याची गरज नाही. आणि रिपोर्ट पॉजिटिव आला तर त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार करण्यास मदत होईल. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या नेतृत्वात प्रशासन अहोरात्र काम करित आहे. नागरिकांनीसुद्धा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री राठोड  यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad