Breaking

Post Top Ad

सोमवार, ६ जुलै, २०२०

'शिवसेना स्टाईलमध्ये काॅग्रेस खासदारांने मोदींवर केली टिका'


शिवसेना स्टाईलमध्ये काॅग्रेस खासदारांने मोदींवर केली टिका
By महाराष्ट्र24 टिम देशात सध्याच्या घडीला इंधन वरून दर वाढी विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे दिसून येत असताना काॅग्रेसचे राज्यातील एकमेव खासदाराने भाजप च्या कार्यकर्त्यांना चांगलाच दम देत इशारा दिला आहे. "जनतेची सेवा आम्ही करणारच मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी जास्तच अंगात आणली तर आम्ही त्यांची सुध्दा सेवा करू" असा इशारा यावेळी काॅग्रेसचे खासदार यांनी दिला आहे.

चंद्रपुर लोकसभा मतदार संघातील आर्णी(यवतमाळ) येथे महाविकास आघाडी च्या नेत्यांनी सोमवारी इंधन दरवाढीच्या विरोधात मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध केला. दरम्यान राज्यातील काॅग्रेसचे एकमेव खासदार असलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी मोदी सरकारवर सडकून टिका करित भाजप कार्यकर्त्यांना इशारा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १३३ कोटी जनते सोबत आधी माफी मागावी, तात्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काळात पेट्रोल- डिझेलचे भाव कमी होते. त्यावेळी पाच पैसे भाव वाढले तर भाजप देशात आक्रमक आंदोलन करित होते. मात्र आता पेट्रोल-डिझेल चे भाव आकाशाला भिडले असताना मोदींना पंतप्रधान पदावर बसण्याची नैतिक अधिकार आहे का असा सवाल खासदार बाळू धानोरकर यांनी उपस्थितीत केला.

मोदी सत्तेत येण्या आधी म्हणाले होते, की, बातो से काम नही करेंगे लाथोसे करेंगे मग चीनच्या हल्यात देशाचे वीस जवान शहीद झाल्या नंतर ही का चूप बसून आहेत. अशा सवालही काॅग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी उपस्थितीत केला. दरम्यान यावेळी खासदार धानोरकर यांनी बोलतांना म्हटले की, 'आम्ही जनतेची सेवा करूच मात्र त्याच बरोबर भक्तांची सुध्दा सेवा करणार असा इशारा यावेळी भाजप कार्यकर्त्यांना दिला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, माजी आमदार ख्वाजा बेग सह शिवसेना, काॅग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थितीत होते. 
खासदार बाळू धानोरकर यांनी काय म्हटलं ते नक्की बघा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad