Breaking

Post Top Ad

मंगळवार, २८ जुलै, २०२०

'यवतमाळ जिल्हात नव्याने ४० जण पॉझिटीव्ह'


यवतमाळ जिल्हात नव्याने ४० जण पॉझिटीव्ह
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज (दि.२८) पुन्हा ४० पॉझिटीव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले १६ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मंगळवारी नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ४० जणांमध्ये २३ पुरुष व १७ महिलांचा समावेश आहे. यात पांढरकवडा येथील मजीद वार्डातील १७ पुरुष व १४ महिला, पुसद येथील ३ पुरुष व २ महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, दारव्हा येथील दोन पुरुष व एक महिलेचा समावेष आहे. 

जिल्ह्यात सोमवारपर्यंत ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३०० होती. यात आज ४० नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ३४० वर पोहचला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या १६ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३२४ आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे २९२ तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटीव्ह आलेले ३२ जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ८५२ झाली आहे. यापैकी ५०२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २६ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ८२ जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज १०० नमुने तपासणीकरीता पाठविले. महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत १४२५१ नमुने पाठविले असून यापैकी १२४०८ प्राप्त तर १८४३ अप्राप्त आहेत. तसेच ११५५६ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
'त्या' दहा जणांचा अवाहल मिळेपर्यंत तहसील बंद

आर्णी येथील तहसील कार्यालयातील एका मंडळधिकाऱ्याला कोरोना झाल्याचा अवाहल आल्याने तहसील कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॉझिटीव्ह अधिकाऱ्यांच्या संपर्कातील दहा अधिकारी-कर्मचारी यांचा निगेटिव्ह टू पॉझिटीव्ह चा अवाहल आल्या नंतरच तहसील मधील कामकाजला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. संपर्कात आलेल्या दहा जणांचा कोरोना  अवाहल आल्यानंतर नेमके किती जण पॉझिटीव्ह आहेत की, नाही हे स्पष्ट होणार आहे. 
पुसद- दिग्रस मध्ये ३१जुलै पर्यंत संचारबंदी
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी पुसद व दिग्रस शहरात व या शहरालगतच्या भागात ३१ जुलै २०२० च्या मध्यरात्रीपर्यंत  संचारबंदी लागू केली आहे.

संचारबंदीच्या कालावधीत पुढील बाबी, आस्थापना, व्यक्ती व समूहाला सुट राहील. सर्व शासकीय कार्यालये त्यांचे संपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल तसेच त्यांच्या वाहनांना कार्यालयात येणे व घरी जाणे याकरीता मुभा राहील. पुसद व दिग्रस शहरातील व शहरालगतच्या क्षेत्रातील संपूर्ण अत्यावश्यक सेवेची व इतर सेवेची, वस्तुंची दुकाने व बाजारपेठ संपूर्णत: बंद राहतील. सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांचे औषधालये दररोज २४ तास सुरू राहतील. ऑनलाईन औषध वितरण सेवा व शासकीय, खाजगी दवाखान्यालगत असलेली औषधीविक्री दुकाने २४ तास सुरू राहतील. तसेच इतर ठिकाणी असलेली एकल औषधी दुकानेसुद्धा सुरू राहतील.

प्रिंट मिडीया, ईलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वर्तमानपत्र वितरक यांना घरपोच वर्तमानपत्रक वाटपासाठी मुभा राहील. आठवडी बाजार, भाजीमंडी, फळ मार्केट बंद राहील. भाजीपाला व फळे गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन विक्री करण्यास सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत मुभा राहील. एका ठिकाणी बसून विक्री करता येणार नाही. दुध संकलन व दुध विक्री तसेच फिरते दुध विक्री सकाळी ७ ते सकाळी १० पर्यंत मुभा राहील. तसेच फिरते दुध विक्री ह्या बाबीस सायंकाळी ७ ते रात्री ८ ह्या वेळेत सुद्धा मुभा राहील. सर्व केश कर्तनालय, सलुन, ब्युटी पार्लर दुकाने संपुर्णत: बंद राहतील. पेट्रोल, डिझेल पंप सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तर अत्यावश्यक सेवेकरिता २४ तास सुरू राहतील. घरगुती गॅस फक्त घरपोच वितरण करण्यास  सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत वितरण करण्यास मुभा देण्यात येत आहे. परंतु गॅस वितरक कर्मचारी यांनी गणवेश व ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

कृषी साहित्य, रासायनिक खतविक्री, बी-बियाणे विक्री व वाहतुक त्यांचे गोदामे व दुकाने सकाळी ७ ते दुपारी १२ या कालावधीत चालू राहतील. शेतीची पेरणी, मशागतीस व संपुर्ण शेतीच्या कामास मुभा राहील. स्वस्त धान्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहतील तथापि त्याठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक राहील. मालवाहतुक सेवा पुर्ववत चालू राहील.

पुसद व दिग्रस शहरातील सर्व बँका शासकीय कामाकरीता व त्यांचे बँकींग कामासाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार चालू राहतील. बँकेत ग्राहकांसाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मुभा राहील.  अंत्यविधी प्रक्रिया पार पाडण्यास पुर्वी दिलेल्या अटी व शर्तीनुसार ५० लोकांची मुभा राहील. सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादी संपुर्णत: बंद राहतील. टु व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, बंद राहतील तथापि अत्यावश्यक सेवेतील वाहने, पुर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर अनुज्ञेय राहील. चिकन, मटन, अंडी, मासे मार्केट व विक्री बंद राहील. सर्व रेस्टॉरंट, हॉटेल, (कोविड-१९ करिता वापरात असलेले वगळून), उपाहारगृह, लॉज, रिसॉर्ट, मॉल, बंद राहतील. जेवणाची घरपोच पार्सल सुविधा बंद राहील. सर्व दारुची दुकाने बंद राहतील. मंगल कार्यालये, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपुर्णत: बंद राहतील. पुसद व दिग्रस शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नियमानुसार परवानगी राहील. जार वॉटर सप्लायर्स यांना सामाजिक अंतराचे पालन करत सकाळी ७ ते १२ या वेळेत ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल. पुसद व दिग्रस शहरातील औद्योगिक कारखाने उद्योग शिफ्टनुसार सुरू राहतील. इलेक्ट्रीशियन्स, प्लंबर इत्यादींना घरी जाऊन ईलेक्ट्रीशियन्स, प्लंबींगचे काम करण्यास मुभा राहील. मॉर्निंग वॉक, ईव्हीनिंग वॉक, जॉगिंग, खेळाच्या मैदानारील व्यायाम इत्यादींवर बंदी राहील.

पुसद व दिग्रस शहरातील राज्य, केंद्र शासनाचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटींग व डिजिटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबंधीत मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्यावश्यक सेवा तसे कृषी, बी-बीयाणे, खते, गॅस वितरक, पाणी पुरवठा आरोग्य व स्वच्छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्नीशमन सेवा, जलनि:सारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळ्याच्या दरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे, वीज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, तसेच प्रतिबंधीत क्षेत्राकरिता नियुक्त कर्मचारी यांनाच चार चाकी, दुचाकी (स्वत:करीता फक्त) वाहन वापरण्यास परवानगी राहील. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत:चे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वत:चे आधारकार्ड सोबत ठेवावे.

सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इत्यादी बंद राहतील, तथापी ऑनलाईन आंतरशिक्षण यास मुभा राहील. तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांची दुकाने, चहाकॉफी सेंटर, पानठेला बंद राहतील. पुसद व दिग्रस शहरातील व शहरालगताच्या भागातील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती आणि जोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, १० वर्षापेक्षा कमी वयाची मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.

सदर आदेश यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व दिग्रस शहर तसेच या शहरालगतच्या परिसरास लागू राहतील. उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांचेवर वरिलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्या अनुषंगाने संनियंत्राणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांचेवर साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणी भारतीय दंड संहिता १८६० तसेच इतर संबंधीत कायदे व नियमानुसार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad