भारत-चीन हल्या नंतर काॅग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर गलवान प्रश्नांवरून हल्ला चढवला आहे.गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर विरोधकांनी प्रश्न विचारत केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
त्या अनुषंगाने केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून भारत-चीन वर चर्चा केली. मात्र खासदार राहूल गांधी यांनी ट्विटर च्या माध्यमातून मोदी सरकारवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. राहूल गांधी यांनी ट्विटर च्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना दोन सवाल विचारले आहेत. "चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती", असा सवाल करत राहूल गांधी यांनी प्रश्न उपस्थिती केले आहे.
![]() |
| राहूल गांधी यांनी केलेला टिवट |
"आमच्या जवानांना का मारण्यात आलं? त्यांना कुठे मारण्यात आलं?", असे प्रश्न राहूल गांधी यांनी सरकारला विचारला आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या हल्यानंतर राहूल गांधी सातत्याने ट्विटर च्या माध्यमातून केंद्र सरकारला प्रश्न विचारत आहेत. या आधी सीमेवर काय घडलं आहे. देशाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या जवानांना मारण्याची चीनची हिंमत होतेच कशी? आपल्या हद्दीत येण्याची चीननं हिम्मत कशी केली आदी प्रश्न राहूल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

