लोकशाही राजकीय
व्यवस्थेत लोकांचे कल्याण साधायचे असेल तर सत्तारूढ पक्षावर जनतेचा अंकुश असणे
आवश्यक आहे.ब्रिटन सारख्या घटनात्मक राजेशाही असलेल्या
देशातील राजेशाही ही नाममात्र असून वास्तविक सत्ता जनतेने निवडून दिलेल्या हाऊस ऑफ
कॉमन्स मधील म्हणजेच संसदेच्या पहिल्या सभागृहातील लोकांनी निवडून दिलेल्या बहुमतवाल्या
पक्षाच्या हाती असते.बहुमतवाल्या पक्षाचा नेता पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ ही
ब्रिटनमधील वास्तविक कार्यपालिका आहे. मात्र या कार्यपालिकेवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी
पक्ष मजबूत असला पाहिजे ही ब्रिटिश जनतेची धारणा आहे. त्यामुळेच इंग्लंडमध्ये विरोधी
पक्षाच्या नेत्याला मंत्री पदाचा दर्जा असतो आणि विरोधी पक्षाला राजाश्रय आहे हे
दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे वर्णन "हर मॅजेस्टिज अपोझिशन" असे
केल्या जाते.सत्तारूढ पक्ष जर चुका करीत असेल तर त्याची त्याला जागा दाखवून
देण्याचे सामर्थ्य ब्रिटिश जनतेमध्ये आहे. उदाहरणार्थ
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडला प्रचंड विजय मिळवून देणारा विन्स्टन चर्चिल
नंतर झालेल्या सार्वत्रिक निवडून आला तरी त्याचा हुजूर पक्ष पराभूत झाला आणि मजूर
पक्षाचा नेता क्लिमेंट ॲटली हा पंतप्रधान झाला.
भारताला
स्वातंत्र्य मिळाले त्यात महत्वाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो इंग्लंडमध्ये
झालेल्या सत्ता बदलाचाही आहे.हे आपण लक्षात घेतले पाहिजे.ॲटली सत्तेवर आल्यानंतर त्याने हाऊस ऑफ
कॉमन्स मध्ये भारताला स्वराज्य देण्याबाबतचा ठराव मांडला होता.गंमत अशी की,या ठरावाला विरोध करतांना विन्स्टन
चर्चिलने जे भाषण केले होते, ते लक्षात घेतले तर भारताला स्वातंत्र्यासाठी किमान
पाच वर्ष आणखी प्रतिक्षा करावी लागली असती.चर्चिलने
स्वातंत्र्याच्या ठरावाला विरोध करताना म्हटले होते की, या क्षणी भारताच्या स्वातंत्र्याची
बागडोर काँग्रेसच्या हाती देणे याचा अर्थ लाखो भारतीयांचे भवितव्य बदमाश, लुच्च्या आणि लफंग्या लोकांच्या
हाती देण्यासारखे होईल.हे लोक प्रत्येक गोष्टीवर कर लावतील केवळ हवा तेवढी करमुक्त
असेल.ॲटलीच्या धोरणामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले अर्थात स्वातंत्र्य चळवळीत
ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले आणि जसे जमेल तसे योगदान दिले त्यांचे कर्तृत्व
नाकारता येत नाही.
त्यांच्या
कर्तृत्वाचा वाटा 90 टक्के असला तरी 10 टक्के वाटा ॲटलीचा नक्कीच आहे.हे
सारे सांगण्याचे कारण असे की लोकशाहीत विरोधी पक्ष हा मजबूत असणे आणि त्या
पक्षाच्या भावनांची,विचारांची कदर करणे हे सत्तारूढ
पक्षाचे पहिले काम आहे.मात्र अलीकडच्या काळात देश कितीही संकटात असला तरी विरोधी
पक्षांची खिल्ली उडवण्यात अंधभक्तांना आसुरी आनंद मिळतो, अंधभक्तीला देशभक्ती समजण्याची चूक
आपण करत आहोत.हे आपल्या लक्षात येत नाही. कोणत्याही गोष्टीचा मग अतिरेक झाला की,मुक्तीचा आक्रोश वेगवेगळ्या
माध्यमातून प्रकट होतो.विरोधी पक्षांची व
त्यांच्या नेत्यांची आपण खिल्ली उडवतो तेव्हा आपलीही आज ना उद्या कुणी खिल्ली
उडवेल याचा विचार सत्तारूढ पक्षाने केला पाहिजे.कोणाला आपण ” पप्पू” म्हणतो तेव्हा आपल्यालाही कोणी “ गप्पू” म्हणेल,तेव्हा ते सहन करण्याची क्षमता
ठेवली पाहिजे. आता हेच पहा मोदींची काही धोरणे
कितीही चांगली असली तरी कळत न कळत केलेल्या चुकांबद्दल दिलगिरीही
व्यक्त करण्याचे धाडस त्यांनी दाखवले पाहिजे.अमेरिकेत मोनिका प्रकरण घडले तेव्हा राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन ने सिनेट समोर
मोनिकाशी असलेल्या आपल्या अनैतिक संबंधाची कबुली देत देशाची माफी मागितली.त्या
देशाच्या सिनेटने देखिल उदार अंतकरणाने माफ केले.जर्मनीमध्ये
हिटलर आणि त्याचा प्रचार मंत्री गोबेल्स यालाही चुकांची जाणीव झाली तेव्हा आता
माफीने काही होणार नाही,हे लक्षात आल्यावर हिटलरने बंकर मध्ये जाऊनआपल्या प्रेयसीसह
आत्महत्या केली.
हिटलरने
गोबेल्सला चांसलर म्हणून नियुक्त केले होते. पण काही दिवसातच त्याने पत्नी आणि
सहा मुले यांच्यासह बंकर मध्ये जाऊन आत्महत्या केली.तात्पर्य
राजकीय व्यवस्थेत राज्यकर्त्यांनी विरोधी पक्षांचा सन्मान केला पाहिजे,विरोधी पक्षाचे चुकत असले तरी ते
आपले कर्तव्य करीत आहेत.असे समजून,विधायक टीका समजुन त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे.अन्यथा
अशोभनीय प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते.परवा एका त्रस्त मजूर महिलेने माननीय पंतप्रधानांची अशोभनीय
शब्दात संभावना केली.अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त करणे हेही शहाणपणाचे ठरत नाही, पण टाळी एका हाताने वाजत नाही,हि म्हण मग अशावेळी खरी ठरते.समाज
माध्यमांवर फिरत असलेल्या काही प्रतिक्रिया पहा.
कृपया भक्तों से न लड़ें, न ही बहस करें!याद रखिये..हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं! 40 ट्रेन अगर कांग्रेस के राज में भटक गए होती,तो भक्त सड़क पर डांस करके रेलमंत्री का इस्तीफा मांग रहे होते बीजेपी सरकार पर दबाव बढ़ते ही सीमा पर तनाव बढ़ जाता है।ये रिश्ता क्या कहलाता है हिटलर जब कमजोर होनें लगा था,तो पड़ोसी देश भी हावी होने लगे थे।तब हिटलर ने पूरे जर्मनी को युद्ध मे झोंक दिया था।लाखों का चश्मा, करोड़ों का सूट, अमीरों की रक्षा, गरीबों की लूट, 6 साल से बोल रहें झूठ-पर-झूठ पहचानों कौन। अंतरराष्ट्रीय स्तर पर पहचान बनाना है तो गौतम बुद्ध के साथ अपने आप को जोड़ना ही पड़ेगा। मोदी जी जब भी अमेरिका व अन्य विदेश देश जाते हैं, तो वहां भाषण में कहते है कि..."भारत ने दुनिया को विश्व शांति का प्रतीक गौतम बुद्ध दिया है" वहां मोदी जी भारत के मर्यादा पुरुषोत्तम का नाम नही लेते हैं। सेना की बहादुरी में मोदी का हाथ है,तो मज़दूरों की हालत की ज़िम्मेदारी भी तो मोदी की ही हुई!टेस्टिंग किट में घोटाला,वेंटिलेटर में घोटाला,PPE किट में घोटाला राशन में घोटाला...फिर भी कोई दाग हॅलो नहीं। फ़टे हुए दूध को खीर बताया जा रहा है। एक डरपोक को वीर बताया जा रहा है।या अशा प्रतिक्रिया का व्यक्त होतात याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आत्मनिर्भर चा संदेश देणाऱ्यांची आहे.कौतुकाचे पियुष अर्थात अमृत हवे असेल तर इतरांना अपमानाचे हलाहल तरी द्यायला नको इतके तरी शिकले पाहिजे.
लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत.मो.न. 8805948951

