Breaking

Post Top Ad

रविवार, १४ जून, २०२०

काॅग्रेसच्या नाराजी वर चर्चा?

काॅग्रेसच्या नाराजी वर चर्चा
मुंबई:- राज्यात शिवसेना,काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्षा एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे.मात्र महाविकास आघाडी सरकाराच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काॅग्रेसचे मंत्री नाराजी असल्याचे बोलल्या जात आहेत.या विषयावर तोडगा काढण्यासाठी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्याने काॅग्रेस मधिल मंत्री नाराज आहेत.या प्रश्नावर मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून महसुल मंत्री तथा काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सोबत फोन वर चर्चा केल्याची माहिती आहेत.काॅग्रेस मंत्र्यांच्या नाराजी संदर्भात सोमवारी चर्चा करण्यात येईल,असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन वर दिले आहे.त्यामुळे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची थोरात आणि चव्हाण हे भेट घेणार आहेत.काॅग्रेस च्या मंत्र्यांना सरकार मध्ये दुय्यम स्थान मिळत असल्याची ओरड असून,धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत काॅग्रेस मंत्र्यांना सहभागी करण्यात यावे आणि विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांचे तीनही पक्षांना समान वाटप व्हायला हवे.काॅग्रेसला पाच जागा शिवसेना व राष्ट्रवादीने सोडायला हव्यात,अशी काॅग्रेसची भूमिका आहेत.या सर्व प्रश्नांवर काॅग्रेसचे मंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत सोमवारी चर्चा करणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad