भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या झटापटी मुळे भारताचे २० जवान गलवान च्या खाईत पडून शहीद झाले. या घटनेत चीनचे सुध्दा दुप्पट सैनिकांचा खात्मा झाला मात्र चीनच्या ग्लोबल टाइम्स च्या माध्यमातून तशी अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही.
चीनचे आघाडीचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स ने पहिल्या पानावर प्रकाशीत केलेल्या बातमीत म्हटले आहे की,भारत अंहकरातून आणि निष्काळजीपणाने चीनच्या सीमेवर सातत्याने तणाव निर्माण करित आहे. अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे भारत असे पाऊल उचलत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारतातील माध्यमातून चीनचे सैनिक कमकुवत असल्याचे चित्र रंगवत असल्याचे ग्लोबल टाइम्स ने म्हटले आहे.
भारत आक्रमक मूड मध्ये.!
भारत आणि चीन मधील सीमावादाचे रूपांतर रक्तपातात होत असताना चीन ला प्रत्युत्तर देण्याच्या मूड मध्ये असून पंतप्रधान आणि रक्षामंत्री व जवानांच्या प्रमुखां सोबत बैठका वर बैठक सुरू आहे.त्यामुळे चीन सोबत युद्ध होणार असल्याचे संकेत आहे.
चीन आणि भारत हे दोन्ही देश मोठे आहेत.सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता दोन्ही देशांसाठी महत्वाची आहे. चिन बरोबर चे संबंध बिघडवण्यासाठी अमेरिकेने भारताला भडकवल्याची टिका ग्लोबल टाइम्स ने केली आहे.चीन ला कमकुवत समजू नये अशा इशारा देखील देण्यात आला आहे. चीन-भारत सीमाप्रश्ननावर चिनी जनतेनी सरकारवर आणि पीपल्स लिबरेशन आर्मी वर विश्वास ठेवण्याचे आवाहन देखील ग्लोबल टाइम्स ने केले आहे.त्यामुळे चीन किती खोटा बोलतो हे या निमित्ताने समोर आले आहे.

