Breaking

Post Top Ad

बुधवार, १७ जून, २०२०

चीनला करारा जवाब कधी देणार; संजय राऊत

चीनला करारा जवाब कधी देणार; संजय राऊत

भारतीय जवानांवर कोणतीही गोळी न चालवता चिनी सैनिकांनीच्या हल्यात देशाचे वीस जवान शहीद झाले त्यामुळे चीनला करारा जवाब कधी देणार आहेत. असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटर च्या माध्यमातून मोदी सरकारला विचारला आहे.

काल गलवान खोऱ्यात सीमेवर चीनी सैनिकांच्या झटापटीत भारताचे वीस जवान शहीद झाले होते. या संदर्भात चीन विरोधात देशवाशीयांकडून तीव्र निषेध व्यक्त केल्या जात असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटर च्या माध्यमातून सरकार चीन ला करारा जवाब कधी देणार आहेत.अशा प्रश्न विचार ला आहे.

नियंत्रण रेषेवर चीन सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाल्याने त्यावरून शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. पंतप्रधान मोदीजी, तुम्ही शूर आहात. योद्धे आहात. तुमच्या नेतृत्वाखाली चीनचा बदला घेणार का? चीनला करारा जवाब कधी देणार; असा सवाल शिवसेनेने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला केला आहे.
दरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुध्दा याच मुद्याला हात घालत केंद्र सरकारवर टिका केली आहे. चीनने भारताच्या भूमीत घूसून आपले जवानांना मारलं आहे. अशा प्रसंगी चीनला कायमाचा धडा शिकवण्याची गरज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत संपुर्ण देश आहेत. मोदींजीनी आक्रमक भूमिका घेवून चीनला प्रत्युत्तर द्यावं अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर च्या माध्यमातून केली आहेत
शिवसेना  खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून चीनच्या कुरापतीवरून मोदी सरकारला डिवचले आहे. राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत मोदींची स्तुती करित चिमटेही काढले आहेत. चीनच्या अरेरावीला सडेतोड उत्तर दिलं कधी देणार आहेत? चीनने एकही गोळी चालवली नाही. तरीही आमचे २० जवान शहीद झाले. आपण काय उत्तर दिलं? चीनचे किती सैनिक मारले? चीन आपल्या भूप्रदेशात घुसला आहे का? पंतप्रधानजी, या संकटाच्या काळात देश तुमच्या सोबत आहेत, पण सत्य काय आहे ते सांगा? काही तरी बोला. देशाला सत्य माहिती पडू द्या, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. मोदीजी, तुम्ही शूर आणि योद्धे आहात. तुमच्या नेतृत्वात देश चीनचा बदला घेईल का? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad