स्मृती-पलाशचे लग्न मोडेपर्यंत नेमकं काय घडलं!

 


मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत गेल्या आठवडाभर सोशल मीडियावर आणि क्रीडा जगतात प्रचंड चर्चा सुरू होती. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगलीत धुमधडाक्यात सातफेरांना सुरुवात झाली असताना, काही तासांतच संपूर्ण सोहळा स्थगित झाला आणि अखेरीस ७ डिसेंबर २०२५ रोजी स्मृतीने इंस्टाग्राम पोस्टद्वारे लग्न अधिकृतपणे रद्द झाल्याची घोषणा केली.

फॅन्स आणि क्रिकेटप्रेमी अजूनही यामागील खरा कारण शोधत असताना, या नात्याचा २०१९ पासून ते २०२५ मध्ये लग्न मोडेपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम पुढीलप्रमाणे 

 २०१९ - नात्याची सुरुवात - स्मृती आणि पलाश यांनी २०१९ मध्ये डेटिंग सुरू केलं. दोघांनी नातं खासगी ठेवलं पण एकत्र वाढदिवस व ॲनिव्हर्सरी साजरे करताना फोटो पलाशच्या इंस्टाग्रामवर दिसत होते.

मार्च २०२३ - WPL विजयानंतर नातं सार्वजनिक

स्मृतीने RCB चे नेतृत्व करत WPL जिंकत इतिहास रचला. त्यानंतर पलाशने तिच्यासोबतचा पहिला सार्वजनिक फोटो पोस्ट केला. जुलै २०२४ - ५ व्या ॲनिव्हर्सरीची घोषणा

दोघांनी केक कापतानाचे फोटो शेअर करत नात्याची पाच वर्षे पूर्ण झाल्याचे जगासमोर मान्य केले.

नोव्हेंबर २०२५ - विश्वचषक विजय आणि प्रपोझल

स्मृतीने विश्वचषक जिंकला. पलाशने तिच्या नावाची आद्याक्षरे आणि जर्सी क्रमांक असलेला “SM 18” टॅटू दाखवत फोटो शेअर केला. २१ नोव्हेंबरला DY पाटील स्टेडियमवर प्रपोझ → अधिकृत साखरपुडा.

२३ नोव्हेंबर २०२५ - सांगलीत लग्नास सुरुवात

क्रिकेटर्स आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न विधी सुरू… परंतु अचानक स्मृतींच्या वडिलांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल. २४ नोव्हेंबर २०२५ - पलाशही रुग्णालयात दुसऱ्याच दिवशी पलाश मुच्छललाही दाखल करावं लागलं. सोशल मीडियावर अफवा आणि अंदाजांचा पाऊस. 

७ डिसेंबर २०२५ - लग्न अधिकृतपणे रद्द

दीर्घ शांततेनंतर अखेर स्मृती मानधनाने इंस्टाग्रामद्वारे घोषणा केली “माझं लग्न रद्द करण्यात आलं आहे. दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा. माझ्यासाठी सर्वांत मोठं ध्येय म्हणजे भारतासाठी खेळणं आणि तेच कायम राहील.” तिच्या या पोस्टनंतर लाखो कमेंट्स आणि प्रचंड चर्चा सुरू झाल्या परंतु लग्न रद्द होण्यामागील खरे कारण तिने उघड केलेले नाही.

नेटिझन्स आणि क्रीडा विश्वाची एकच प्रतिक्रिया आदर आणि पाठिंबा, फॅन्स, क्रिकेटर, BCCI खेळाडू आणि क्रीडा तज्ज्ञांनी स्मृतीच्या निर्णयाचा आदर करत “तू आधी खेळाडू आहेस आणि आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत” असे संदेश पाठवले.

स्मृती किंवा पलाश दोघांनीही लग्न रद्द होण्यामागील नेमके कारण जाहीर केलेले नाही. 

कुटुंबीयांच्या आरोग्य समस्या?व्यक्तिगत मतभेद? करिअरमधील प्राधान्य? की काही अजून गंभीर? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. परंतु सध्या दोन्ही कुटुंबे गोपनीयता जपण्याचा आग्रह धरत आहेत.


----------









Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने