शरद पवारांनाही खास उपमा, अमृता फडणवीसांची धडक मुलाखत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याचे समीकरण, २०१९ मधील सत्ताबदल आणि महाविकास आघाडीचा प्रयोग यावर खुल्या मनाने भाष्य करत तसेच राज्यातील प्रमुख नेत्यांना चित्रपटसृष्टीतील पात्रांच्या आधारावर उपमा देत अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत आल्या आहेत. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्यासह काही नेत्यांबद्दल रॅपिड फायर राऊंडमध्ये थेट आणि बिनधास्त प्रतिक्रिया दिल्या.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, “मी देवेंद्र फडणवीस यांना थेट राजकीय सल्ले देत नाही, पण कधीकधी माझे टोले खरेही ठरतात.” २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप–शिवसेना युतीचे सरकार स्थापन होण्याऐवजी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेचा मार्ग स्वीकारला, त्याविषयी त्यांनी उघडपणे आठवण सांगितली.
“मी निवडणुकीच्या आधीच देवेंद्रजींना विचारले होते, तीन पक्षांना चांगल्या जागा मिळाल्या तर शिवसेना काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत गेली तर काय? मला मनात शंका वाटली होती. देवेंद्रजींनी मला सांगितलं होतं की असं होणार नाही कारण उद्धवजी आमच्याही खूप जवळचे आहेत आणि असा धोका होणार नाही. पण माझी शंका तशीच राहिली,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुलाखतीतील सर्वात जास्त चर्चेत आलेला भाग म्हणजे रॅपिड फायर राऊंड. नाव सांगितल्यावर सिनेमा, गाणं, पात्र किंवा डायलॉग आठवला तर सांगण्याचं आव्हान अमृता फडणवीस यांना देण्यात आलं आणि त्यांनी दिलेली उत्तरे आता व्हायरल झाली आहेत.
अमृता फडणवीस यांच्या प्रतिक्रिया अशा, उद्धव ठाकरे –
“शोले चित्रपटातील जेलरसारखे वाटतात.”
राज ठाकरे – “नाना पाटेकरांसारखी पर्सनॅलिटी.”
शरद पवार – उपमा चर्चेत
या रॅपिड फायर उत्तरांमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. समर्थक, टीकाकार, आणि ट्रोलर्स सर्वच बाजूंनी विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आगामी राजकीय वातावरण, मुंबई आणि राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत महत्त्वाची मानली जात आहे. मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळातील चर्चा आहे की, अमृता फडणवीस यांची शैली ही नेहमीच स्पष्ट, थेट आणि निर्भीड राहिली आहे आणि या मुलाखतीने ती प्रतिमा आणखीन ठळक झाली आहे.
---------------------------- समाप्त ----------------------
