Breaking

Post Top Ad

गुरुवार, २५ जून, २०२०

राहुल गांधी का संतापले?

राहुल गांधी का संतापले
काॅग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नसून यापुढेही त्यांच्यावर टीका करणार असल्याचं स्पष्ट काॅग्रेस च्या बैठकीत केले.दरम्यान पक्षातील काही नेते मात्र त्यांच्यावर टीका करण्यापासू दूर राहतात अशी माहिती या बैठकीतून पुढे आली आहेत.

राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत लडाखपासून ते देशावरील आर्थिक संकटांपर्यंत सर्व गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घेण्यात आलेले निर्णय जबाबदार असताना त्यांना जाब विचारल्याशिवाय चर्चाच होऊ शकत नाही असं म्हटलं. महत्त्वाचं म्हणजे, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही राहुल गांधी यांचा समर्थन करत मोदींविरोधात ते एकटेच लढत असल्याचं सांगितले.
प्रियंका गांधी यांनीही यावेळी राहुल गांधी यांच्या मताशी सहमत असल्याचं सांगत राहुल गांधी आणि काही नेते वगळता इतर सर्व नेते नरेंद्र मोदींवर टीका करत नसल्याचं म्हटलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या मताशी सहमत असल्याचं सांगत नरेंद्र मोदींवरच टीका केली पाहिजे यावर एकमत केलं
पक्षातील इतर नेत्यांनीही अनेकदा मत मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधल्याने भाजपा आणि मोदींना सहानुभूती मिळते आणि त्याचा ते फायदा उचलतात असं म्हटलं जातं  आहे. तसंच याचा तोटा काँग्रेसला होत असल्याचंही काॅग्रेस नेत्यांचे म्हणणं आहेत. २०१९ च्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पक्षाचा प्रचार मोदींवर जास्त केंद्रीत राहिला आणि इतर मुद्द्यांना पक्षाने मांडलंच नाही अशी चर्चा देखील यावेळी काॅग्रेस मध्ये करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन रोज लक्ष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आक्रमक झालेले पहायला मिळाले. काँग्रेसच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका न करता पक्षाच्या धोरणावंर टीका केला पाहिजे असं मत मांडलं. राहुल गांधी यांना हे न पटल्याने त्यांनी आक्रमक भूमिका मांडत आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका का करतो हे स्पष्ट केलं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad