नवीन वर्षात बार उडवायचा आहे? पहा 2026 मधील संपूर्ण 59 विवाह मुहूर्तांची विस्तृत यादी !


Vivah Muhurat 2026 : नवीन वर्ष 2026 विवाहासारख्या मंगल कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले जात आहे. ज्योतिषीय गणना आणि द्रिक पंचांगानुसार 2026 मध्ये एकूण 59 शुभ तिथी विवाहासाठी उपलब्ध राहणार असून अनेक योग, वार, नक्षत्र आणि ग्रहस्थिती विवाहासाठी अनुकूल असतील. त्यामुळे 2026 हे वर्ष लग्नबंधनात अडकू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे.

द्रिक पंचांगानुसार खरमास 16 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. मात्र शुक्रास्तामुळे विवाह त्वरित सुरू होणार नाहीत. 9 डिसेंबर 2025 पासून ते 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत शुक्र तारा अस्त राहणार असल्याने या काळात शुभ विधी करणे निषिद्ध आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विवाह मुहूर्त 4 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहेत. यानंतर महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या होलाष्टकामुळे 4 मार्चपर्यंत विवाहबंदी राहील. 14 मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करताच पुन्हा खरमास सुरू होऊन 13 एप्रिलपर्यंत तो लागू राहील. या सर्व कालखंडानंतर एप्रिलपासून पुन्हा शुभ तिथींची मालिका सुरू होते.

नवीन वर्षातील प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या शुभ लग्नतिथी उपलब्ध असून ज्येष्ठ अधिकमास आणि चातुर्मास वगळता सर्वत्र विवाहयोग शुभ मानले गेले आहेत. नववर्षाच्या प्रारंभीच अनेक शुभ संधी लाभणार असून वर्षभर शहनाईचा मंगल नाद ऐकू येणार आहे.

2025–26 मधील सर्व शुभ विवाह मुहूर्तांची याद

 (द्रिक पंचांगानुसार)

डिसेंबर 2025

4, 5, 6 डिसेंबर — सर्वोत्तम विवाह मुहूर्त. यानंतर 16 डिसेंबरपासून खरमास सुरू.

जानेवारी 2026 (4 मुहूर्त)

14 जानेवारी, 23 जानेवारी, 25 जानेवारी, 28 जानेवारी.

फेब्रुवारी 2026 (12 मुहूर्त)

5, 6, 8, 10, 12, 14, 19, 20, 21, 24, 25, 26 फेब्रुवारी.

मार्च 2026 (8 मुहूर्त)

2, 3, 4, 7, 8, 9, 11, 12 मार्च.

एप्रिल 2026 (8 मुहूर्त)

15, 20, 21, 25, 26, 27, 28, 29 एप्रिल.

मे 2026 (8 मुहूर्त)

1, 3, 5, 6, 7, 8, 13, 14 मे.

जून 2026 (8 मुहूर्त)

21, 22, 23, 24, 25, 26, 27, 29 जून.

जुलै 2026 (4 मुहूर्त)

1, 6, 7, 11 जुलै.

नोव्हेंबर 2026 (4 मुहूर्त)

21, 24, 25, 26 नोव्हेंबर.

डिसेंबर 2026 (7 मुहूर्त)

2, 3, 4, 5, 6, 11, 12 डिसेंबर.

2026 वर्षभरात उपलब्ध असलेल्या या एकूण 59 शुभ तिथीमुळे विवाहयोग मोठ्या प्रमाणात वाढणार असून अनेक कुटुंबांतील मंगलकार्यांची मालिका वर्षभर सुरू राहणार आहे. ज्योतिषीयदृष्ट्या स्थिर ग्रहस्थिती, शुभ नक्षत्रे आणि अनुकूल योगांमुळे या वर्षातील बहुतेक मुहूर्त अत्यंत फलदायी मानले गेले आहेत.

[संबंधित माहिती सर्वसाधारण उपलब्ध पंचांगानुसार देण्यात आली आहे. आपापल्या भागातील वेगवेगळे पंचांग आणि ग्रह स्थितीनुसार एखाद्या तारखेत बदल राहू शकतो ]


             ------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने