जीवन विमा महत्त्वाचा का आहे? विम्याविषयी मनातील... मोठे गैरसमज दूर करणारी महत्त्वाची माहिती !


Life Insurance Myths : आजच्या काळात आर्थिक सुरक्षिततेचा विचार करताना सर्वात पहिल्यांदा ज्याची गरज भासते, ते म्हणजे जीवन विमा. पण अनेकांना जीवन विमा गुंतागुंतीचा, महाग किंवा नकोसा वाटतो. परिणामी भारतातील तब्बल 83 टक्के लोकांनी आजही जीवन विमा घेतलेला नाही. स्विस रे (2023) च्या अहवालानुसार, देशात जवळपास 17 ट्रिलियन डॉलर्सची "प्रोटेक्शन गॅप" म्हणजेच जीवन विम्याच्या कव्हरेजमधील तफावत आहे, जी जगातील सर्वाधिक मानली जाते. या परिस्थितीत लोकांच्या मनातील गैरसमज हीच सर्वात मोठी अडचण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इन्शुरन्स अवेअरनेस कमिटीचे सदस्यांच्या माहितीनुसार जीवन विम्याबद्दल सात प्रमुख मिथकं आहेत, जी अनेकदा लोकांच्या निर्णयक्षमतेला अडथळा ठरतात.

जीवन विम्याबद्दलचा पहिला गैरसमज म्हणजे ‘तो खूप गुंतागुंतीचा आहे’. प्रत्यक्षात जीवन विम्याचे मूलभूत तत्त्व अगदी सोपे आहे. नियमित प्रीमियम भरल्यास दुर्दैवी प्रसंगी आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते. आज डिजिटल प्लॅटफॉर्म, अ‍ॅप्स आणि एआयच्या मदतीने पॉलिसी समजणे, तुलना करणे आणि व्यवस्थापन करणे अधिक सोपे झाले आहे. 

दुसरा मोठा गैरसमज म्हणजे 'फक्त टर्म प्लॅन पुरेसा नाही'. टर्म प्लॅन जरी किफायतशीर असला, तरी अनेकांना आयुष्यभराची बचत, निवृत्ती नियोजन आणि मुलांच्या भविष्यासाठी अधिक व्यापक साधनांची गरज भासते. जीवन विमा या सर्व गरजांचा विचार करून दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेचा मार्ग उपलब्ध करून देतो.

तिसरा सामान्य गैरसमज असा की, ‘जीवन विमा माझ्या उपयोगाचा नाही’. अनेकांना वाटते की याचा तात्काळ फायदा होत नाही. परंतु जीवन विमा हा गुंतवणुकीपेक्षा संरक्षणाचा आधार आहे, जो आपल्या अनुपस्थितीत संपूर्ण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देतो. 

महत्त्वाचे म्हणजे आज अनेक पॉलिसींमध्ये गंभीर आजार, अपंगत्व किंवा इतर वैद्यकीय परिस्थितींमध्ये रकमेचा लाभ मिळण्याची सुविधा असते. त्यामुळे जीवन विमा फक्त मृत्यूनंतरच नव्हे, तर आयुष्यभराच्या जोखमींविरुद्धही सुरक्षा देतो. या मिथकांमागील गैरसमज दूर केल्यास आर्थिक सुरक्षिततेबाबतचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट आणि विश्वासार्ह होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.


      -----------------------------------------------------------------------------------------------------------------






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने