नवी दिल्ली: केंद्र सरकारने कामगार कायद्यात मोठा बदल करत फिक्स्ड टर्म कर्मचार्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता संस्थेत सलग पाच वर्षे नोकरी करण्याची गरज नाही. फक्त एक वर्षाची सेवा पूर्ण केली तरी कर्मचाऱ्यांना ग्रेच्युटीचा हक्क मिळणार आहे. या बदलानंतर लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून कामगार क्षेत्रात मोठी हलचल निर्माण झाली आहे.
देशातील 29 कामगार कायदे कमी करून त्यांना 4 मोठ्या कोडमध्ये एकत्र आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी जाहीर केला. नवीन कोड्सनुसार देशातील सर्व प्रकारचे कामगार अनौपचारिक क्षेत्र, गिग वर्कर्स, प्रवासी कामगार, महिला कर्मचारी यांना अधिक चांगले वेतन, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य- सुरक्षा याची हमी मिळणार आहे. यामध्ये ग्रेच्युटी नियमातील मोठा बदल विशेष ठरला आहे.
नवीन नियमांनुसार Fixed-Term Employees (FTE) ला पाच वर्षांच्या नियमाची अट राहणार नाही. ते फक्त एका वर्षाच्या सेवेनंतरच ग्रेच्युटीसाठी पात्र ठरणार आहेत.
या कर्मचार्यांना आता कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे सर्व फायदे मिळतील यात • साप्ताहिक सुट्ट्या • मेडिकल फायदे • सोशल सिक्युरिटी • कायम कर्मचार्यांइतकेच वेतन. याचा समावेश आहे. सरकारचे उद्दिष्ट कॉन्ट्रॅक्ट बेस्ड काम कमी करून डायरेक्ट हायरिंग वाढवणे हे आहे.
ग्रेच्युटी म्हणजे कर्मचाऱ्याने संस्थेत दिलेल्या सेवेसाठी कंपनीने कृतज्ञता म्हणून दिलेली एकरकमी रक्कम. आतापर्यंत 5 वर्षे सेवा अनिवार्य होती, परंतु आता नवीन नियमानुसार फक्त 1 वर्षातच ग्रेच्युटी मिळू शकते. फॅक्टरी, खाणी, ऑइल फील्ड, पोर्ट्स, रेल्वे या सर्व क्षेत्रांना पेमेंट अँड ग्रेच्युटी ॲक्ट लागू होतो.पूर्वी केंद्र सरकार 5 वर्षांची मर्यादा 3 वर्षांपर्यंत कमी करण्याचा विचार करत होती. पण प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना दिलासा देत ही मर्यादा एक वर्षावर आणण्यात आली आहे.
ग्रेच्युटी कशी काढतात? — सोपा फॉर्म्युला
ग्रेच्युटी = (अंतिम पगार) × (15/26) × (कंपनीत केलेले वर्ष) उदा: आपला शेवटचा पगार (Basic + DA) = ₹50,000 सेवा = 5 वर्षे तर ग्रेच्युटी = 50,000 × 15/26 × 5 = ₹1,44,230
हा बदल कोणासाठी महत्वाचा?
कॉन्ट्रॅक्ट/FTE कर्मचारी
गिग वर्कर्स (Zomato, Swiggy, Uber इ.)
सर्व्हिस सेक्टर कर्मचारी
प्रायव्हेट कंपन्यांचे कर्मचारी
अनौपचारिक क्षेत्रातील मोठे कार्यबल
या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेत मोठी वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
----------------------------------
