२९ लाख दिव्यांच्या प्रकाशात उजळली रामनगरी
अयोध्या : भगवान श्रीरामांच्या नगरीत अयोध्येत सलग नवव्यांदा भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या वेळी २९ लाख दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण अयोध्या उजळून निघाली, आणि राम की पैरीचे प्रत्येक घाट प्रकाशमय झाले. या अद्भुत दृश्याने संपूर्ण जगाला अयोध्येचे एक मोहक आणि अविस्मरणीय रूप पाहायला मिळाले.
अयोध्या उजळली २९ लाख दिव्यांच्या तेजाने
दीपोत्सव 2025 च्या निमित्ताने अयोध्येत २९ लाख दिव्यांची आरास करण्यात आली. राम की पैरीच्या 56 घाटांवर 26.11 लाख दिवे प्रज्वलित करून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यात आला.
ड्रोनच्या सहाय्याने दिव्यांची मोजणी करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकारी स्वप्निल दंगारीकर आणि निश्चल बरोट यांनी या नव्या विक्रमाची अधिकृत घोषणा केली.
हा विक्रम सलग नवव्यांदा अयोध्येने प्रस्थापित केला आहे.
या ऐतिहासिक क्षणाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रभारी मंत्री सूर्य प्रताप शाही, तसेच भाजप सरकारमधील मंत्री आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
राम की पैरीवर या वेळी संस्कृतिक सादरीकरणे, आरती आणि प्रकाश शो आयोजित करण्यात आला.
दीपोत्सवाच्या वेळी अयोध्येत दुसरा जागतिक विक्रमही नोंदवला गेला शरयू आरतीमध्ये २१०० वेदाचार्यांनी एकत्र सहभागी होत हा अनोखा रेकॉर्ड प्रस्थापित केला. हा विक्रम योगी सरकारने दुसऱ्यांदा साधला आहे
या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून हजारो भाविक आणि पर्यटक अयोध्येत दाखल झाले.
दीपोत्सवानंतर भव्य फटाक्यांची आतषबाजी आणि आकर्षक ड्रोन शो सादर करण्यात आला, ज्याने उपस्थितांची मने जिंकली.
#Ayodhya Deepotsav 2025, #Ramnagari Ayodhya, #29 lakh lamps, #Yogi Adityanath, #Guinness World Record, #Saryu Aarti, #Ram Ki Pari, Diwali festival, #Ayodhya Prakash Mahotsav अयोध्या दीपोत्सव 2025, #रामनगरी अयोध्या, #29 लाख दिवे, योगी आदित्यनाथ, #गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, #सरयू आरती, #राम की पैरी, #दिवाळी उत्सव, #अयोध्या प्रकाश महोत्सव



