जेईई मुख्य परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर

                                                     

 सत्र २१ ते ३० जानेवारी, दुसरे सत्र १ ते १० एप्रिल दरम्यान

मुंबई : देशातील आयआयटींसह अन्य राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा – मुख्य (JEE Main) 2026 च्या तारखा अखेर राष्ट्रीय परीक्षा कक्षाने (NTA) जाहीर केल्या आहेत. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेल्या या परीक्षेचे पहिले सत्र २१ ते ३० जानेवारी, तर दुसरे सत्र १ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहे.

एनटीएकडून यापूर्वीच ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आता नेमक्या तारखाही निश्चित झाल्याने अभियांत्रिकीच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

पहिल्या सत्रासाठीची अर्ज नोंदणी सुरू झाली असून, दुसऱ्या सत्रासाठीची नोंदणी जानेवारी २०२६ च्या अखेरीस सुरू होईल. परीक्षेची केंद्रे यंदा अधिकाधिक शहरांमध्ये वाढविण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातच परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे परीक्षेसाठी लांब प्रवासाचा त्रास विद्यार्थ्यांना टाळता येणार आहे.

एनटीएकडून  जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, जेईई मेन्स २०२६ साठीची अधिकृत माहिती आणि अर्ज लिंक या संकेतस्थळांवर उपलब्ध असेल 

🔗 https://jeemain.nta.nic.in

🔗 http://www.nta.ac.in

एनटीएकडून विद्यार्थ्यांना सल्ला देण्यात आला आहे की, ऑनलाईन अर्ज करताना कोणत्याही तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे पूर्वतयारीत ठेवावीत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी

आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख आणि पत्ता दहावीच्या प्रमाणपत्रानुसार अद्ययावत करावा,

नवीन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तयार ठेवावे,

वडिलांचे नाव आणि संपर्क तपशील योग्यरीत्या भरावे,

दिव्यांग विद्यार्थ्यांनी यूडीआयडी कार्डाची वैधता तपासून घ्यावी,तसेच EWS, SC, ST, OBC-NCL या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या श्रेणी प्रमाणपत्रांची वैधता व अद्ययावतता सुनिश्चित करावी.

एनटीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, आवश्यक कागदपत्रे योग्य आणि वैध ठेवली गेल्यास प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Main) ही देशातील सर्वाधिक स्पर्धात्मक परीक्षा असून, आयआयटी, एनआयटी, आयआयईएसटी आणि इतर अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा आवश्यक आहे. यंदा देखील ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार असून, एनटीएकडून लवकरच तपशीलवार वेळापत्रक आणि प्रवेशपत्राबाबत सूचना जारी केल्या जाणार आहेत.

 #JEE Main 2026, #NTA, Engineering Entrance Exam, #IIT Admission, #National Testing Agency, #JEE Mains Dates, #Joint Entrance Examination, #Maharashtra Students, #jeemain.nta.nic.in, #अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने