प्रचंड तेजी, सोनं 1 लाख 60 हजारांचा टप्पा पार करणार!

                                              

चांदी सव्वा दोन लाखांवर पोहोचणार; तज्ज्ञांचा नवा अंदाज

नवी दिल्ली: सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये प्रचंड तेजी दिसून येत आहे. सध्या सोन्याचा एका तोळ्याचा दर तब्बल 1 लाख 30 हजार रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीने 1 लाख 80 हजारांचा टप्पा गाठला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशीच सोनं आणि चांदीची तब्बल 60 हजार कोटी रुपयांची विक्री झाली असून गुंतवणूकदारांकडून या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार रुपये होता, जो आता पाच वर्षांत 1.30 लाख रुपयांवर गेला आहे. म्हणजेच 200 टक्क्यांहून अधिक परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेतही सोन्याने तब्बल 70 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 76,162 रुपये होता, तर सध्या तो 1,30,840 रुपयांपर्यंत वाढला आहे.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 2026 पर्यंत सोनं आणखी झेप घेणार आहे. ब्रिटनची प्रसिद्ध SSBC बँक आणि बँक ऑफ अमेरिका या दोन्ही संस्थांनी पुढील वर्षासाठी सोन्याचे लक्ष्य वाढवले आहे. SSBC बँकेनुसार 2026 मध्ये सोन्याचे दर 5000 डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याची शक्यता असून, त्या वेळी भारतात सोन्याचा एका तोळ्याचा दर 1.50 ते 1.60 लाख रुपये होऊ शकतो. सध्या जागतिक बाजारात सोन्याचा दर 4500 डॉलर प्रति औंस आहे.

चांदीच्या बाबतीतही गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज हाऊसच्या अंदाजानुसार 2026 मध्ये देशातील चांदीचा दर 2 लाख 40 हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतो. सध्याच्या दरापेक्षा हा 46 टक्क्यांनी अधिक वाढ असेल. जागतिक स्तरावरही चांदीचे दर सतत वाढत असून 2027 पर्यंत 70 ते 77 डॉलर प्रति औंस इतके होऊ शकतात. औद्योगिक मागणीतील वाढ आणि जागतिक पुरवठा घटल्यामुळे चांदीच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या आर्थिक आणि भू-राजकीय परिस्थितीत सोनं आणि चांदी ही सुरक्षित गुंतवणुकीची साधनं बनली आहेत. मध्यपूर्वेतील तणाव, डॉलरमधील चढउतार, आणि अमेरिकन फेडच्या व्याजदर धोरणामुळे गुंतवणूकदारांचा कल सोने-चांदीकडे वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर, पुढील एक-दोन वर्षांत सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंनी ऐतिहासिक उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

#सोनं दर 2025, #चांदी दर 2025, #सोने बाजार, #चांदी बाजार, #गुंतवणूक, #सोन्याचे भाव, #चांदीचे भाव, #Gold Price 2025, #Silver Price 2025, #SSBC Bank, #Bank of America, #Motilal Oswal, #धनत्रयोदशी विक्री, #Gold Investment, #Silver Investment.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने