दिलासादायक! महाराष्ट्राला केंद्राकडून दिलासा
नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वित्त वर्ष 2025-26 साठी महाराष्ट्र राज्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत केंद्राच्या हिस्स्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये एकूण 1,566.40 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
या निर्णयामुळे यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना तात्काळ मदत आणि पुनर्वसनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.\
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेती, घरे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार हा निधी मंजूर केला, ज्यामुळे नुकसानग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध होईल.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार नैसर्गिक आपत्तीच्या काळात राज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.”
चालू वर्षात केंद्र सरकारने एकूण 27 राज्यांना 13,603.20 कोटी रुपये SDRF अंतर्गत, तसेच 15 राज्यांना 2,189.28 कोटी रुपये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत वितरित केले आहेत.
याशिवाय, राज्य आपत्ती न्यूनीकरण निधी (SDMF) अंतर्गत 21 राज्यांना 4,571.30 कोटी रुपये, आणि राष्ट्रीय आपत्ती न्यूनीकरण निधी (NDMF) अंतर्गत 9 राज्यांना 372.09 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे प्रभावित राज्यांना सहाय्य पुरवण्यासाठी केंद्राने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या आहेत.देशभरात यंदा एनडीआरएफच्या विक्रमी 199 तुकड्या बचाव आणि मदत कार्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये एनडीआरएफ, सैन्य आणि वायुसेनेच्या मदतीने बचाव कार्य गतीमान करण्यात आले.
#महाराष्ट्र SDRF निधी, #अमित शाह, केंद्र सरकार, #राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, #पूरपरिस्थिती, #अतिवृष्टी, #नरेंद्र मोदी, #गृह मंत्रालय,#एनडीआरएफ, #आपत्ती व्यवस्थापन, #महाराष्ट्र बातम्या Maharashtra SDRF Fund, #Amit Shah, #Central Government, #State Disaster Response Fund, #Flood Situation, #Heavy Rains, #Narendra Modi, #Home Ministry, #NDRF, #Disaster Management, #Maharashtra News