प्रशासनाचे नुसतेच आवाहन, मात्र खुलेआम लूट सुरू !
मुंबई / पुणे : दिवाळीचा सण जवळ आल्याने गावी जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. रेल्वे आणि एसटी बसचे आरक्षण ‘फुल्ल’ झाल्याने नागरिक खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडत आहेत. मात्र, खासगी बस चालकांनी तिकीटदरात दुप्पट-तिप्पट वाढ केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, अकोला, यवतमाळसह मराठवाडा व विदर्भातील मार्गांवर ही दरवाढ सर्वाधिक दिसत आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, पुणे–नागपूर मार्गावरचे तिकीट जे नेहमी ₹१७०० ते ₹२००० इतके असते, ते आता ₹३५०० ते ₹४००० इतके आकारले जात आहे. ऑनलाइन बुकिंग साइट्सवर दरवाढ स्पष्ट दिसत असून, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. “दिवाळीला गावी जाण्याऐवजी या दरात विमानाने गेलो तरी परवडेल,” असा संताप प्रवासी व्यक्त करत आहेत.
आरटीओने आधीच खासगी ट्रॅव्हल्सना दरवाढ न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच “एसटीपेक्षा दीडपट दरच आकारता येईल” असा नियमही आहे. मात्र, बहुतांश ट्रॅव्हल्स चालकांनी या नियमांकडे साफ दुर्लक्ष केले असून, प्रशासन फक्त “तक्रार करा” असे आवाहन करत आहे. प्रत्यक्ष कारवाई मात्र दिसत नाही.
सणासुदीच्या काळात खासगी बस चालकांनी तिकीट दरात वाढ करू नये, अशा सूचना आरटीओकडून देण्यात आल्या आहेत. दरवाढ करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, खासगी वाहतूकदरांकडून आरटीओंच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईहून इतर ठिकाणी जाणे असो किंवा राज्यात कुठूनही कुठे जायचे असल्यास हाच प्रकार पाहायला मिळत आहे. ऑनलाइन तिकिटाचे दर जगजाहीर पणे वाढवलेले दिसतात प्रशासन मात्र फक्त तक्रारीचे आवाहन करते पण ट्रॅव्हल्स चालकांकडून सर्वसामान्यांची राजरोस लूट सुरू आहे
#दिवाळी२०२५ #खासगीट्रॅव्हल्स #भाडेवाढ #प्रवासीलूट #पुणेनागपूरबस #आरटीओ #मराठवाडा #विदर्भ #दिवाळीप्रवास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response