Breaking

Post Top Ad

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

Kantara Chapter 1 : कांताराचा बॉक्स ऑफिसवर धमाका!

                                                      


पहिल्या भागाच्या लाइफटाइम कलेक्शनवर मात !


मुंबई : कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कांतारा : चॅप्टर 1’ दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आणि अवघ्या सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल ₹306.42 कोटींची कमाई केली असून, पहिल्या भागाच्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकले आहे.


‘कांतारा : चॅप्टर 1’ हा चित्रपट 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आणि दसऱ्याच्या सुट्टीचा लाभ घेत प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यातच 300 कोटींचा टप्पा पार करत हा चित्रपट 400 कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ने एकूण ₹290 कोटींची कमाई केली होती.


पहिल्या आठवड्याची कमाई (कोटींमध्ये):

पहिला दिवस – 61.85, दुसरा  दिवस – 45.40

पाचवा दिवस – 31.50 सातवा दिवस – 15.42

एकूण – ₹306.42 कोटी


‘होम्बाले फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट ‘कांतारा’चा प्रीक्वेल आहे. ऋषभ शेट्टी, रुक्मिणी वलंत, गुलशन देवैया, प्रमोद शेट्टी आणि जयराम यांच्या भूमिका यात आहेत. पहिल्या भागातील घटनांपूर्वी हजार वर्षांपूर्वीच्या काळातील पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे.


प्रेक्षक आणि समीक्षक दोघांच्याही म्हणण्यानुसार, ‘कांतारा : चॅप्टर 1’ हा चित्रपट पहिल्या भागातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं देतो. त्याचबरोबर संगीत, पार्श्वसंगीत, छायांकन आणि व्हीएफएक्स यांचेही विशेष कौतुक होत आहे.


चित्रपटातील भव्य दृश्यरचना आणि दैवी वातावरणामुळे ‘कांतारा : चॅप्टर 1’ला ब्लॉकबस्टरचा मुकुट लाभला आहे, अशी चित्रपटसृष्टीत चर्चा आहे.


 #KantaraChapter1 #RishabShetty #BoxOffice #KannadaCinema #HomBaleFilms #IndianCinema #KantaraPrequel #EntertainmentNews



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad