दररोज 19 कोटी नागरिक उपाशी झोपतात !


भारताचा उपासमारीचा शाप अजून कायमच  

नवी दिल्ली : भारतामध्ये एका बाजूला मॉल्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये रोज कित्येक टन अन्न वाया जाते, तर दुसऱ्या बाजूला कोट्यवधी भारतीय नागरिक अजूनही उपाशी झोपतात. देश पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना ‘भूक’ ही समस्या अजूनही लाखो लोकांसाठी वास्तव बनली आहे. अन्नाची मुबलकता असतानाही उपासमारी ही भारतासमोरची सर्वात मोठी शोकांतिका ठरत आहे.

दरवर्षी १६ ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन (World Food Day) साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संस्था (FAO) मार्फत १९४५ मध्ये या दिवसाची सुरुवात झाली होती. यंदा FAO ला ८० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर भारतातील उपासमारीचे चित्र चिंताजनक आहे.

ताज्या अहवालानुसार, भारतात दररोज १९ कोटींपेक्षा जास्त लोक उपाशी झोपतात. ही संख्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. याचसोबत, दरवर्षी जवळपास ४० टक्के अन्न वाया जाते, ज्याची आर्थिक किंमत तब्बल ९२,००० कोटी रुपये इतकी आहे.

२०२१ च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक ११६ देशांपैकी १०१वा होता, म्हणजेच उपासमारीची समस्या ‘गंभीर’ पातळीवर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वाधिक उपाशी लोक भारतातच आहेत अगदी चीनपेक्षाही जास्त.

जगभरात दरवर्षी तब्बल २,५०० दशलक्ष टन अन्न वाया जाते. केवळ कोविडपूर्व काळातच ९३० दशलक्ष टन अन्न खराब झाले होते. यात ६३ टक्के अन्न घरांमधून, २३ टक्के रेस्टॉरंटमधून आणि १३ टक्के रिटेल दुकानदारांकडून वाया गेले. आर्थिक विषमता ही या संकटामागील प्रमुख कारणांपैकी एक ठरली आहे.

भारत सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) २०१३, मिड डे मील योजना, अंगणवाडी कार्यक्रम, आणि सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) यांसारख्या योजनांच्या माध्यमातून उपासमार कमी करण्याचे प्रयत्न होत असले तरी, अन्नवाटपातील असमानता, साठवणूक व्यवस्थेतील त्रुटी, आणि अन्न वाया जाण्याची प्रवृत्ती यामुळे लाखो लोकांना आजही ‘भूक’ हीच सर्वात मोठी समस्या आहे

#WorldFoodDay #IndiaHungerCrisis #GlobalHungerIndex #FoodWaste #PovertyInIndia #FAO #NFSA #PDS #HungerAwareness #MaharashtraNews

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने