धक्कादायक प्रकरण, कर्जतच्या राशिन पत्ता
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल तापू लागला असतानाच एक भन्नाट आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचं ‘आधार कार्ड’ व्हायरल झालं आहे, आणि त्यावरचा पत्ता आहे थेट कर्जत तालुक्यातील राशिन गावाचा —म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ!
या घटनेमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील त्रुटी आणि बनावट नोंदींवरून सुरू असलेल्या वादाला या प्रकरणाने अधिक धार मिळाली आहे.
आज आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण स्वतः पत्रकारांसमोर उघड केलं. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड दाखवत प्रशासनावर आणि राज्य सरकारवर तीव्र टीका केली.
डोनाल्ड तात्यांसारखे अजून कितीतरी ‘नवीन नागरिक’ आधार कार्ड काढून झाले असतील. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंख्येत एवढी वाढ कशी झाली? हेच मोठं संशयाचं कारण आहे,” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे राशिनचे मतदार! त्यांचं आधार कार्ड तयार झालं आहे, आता ते मतदानही करू शकतात, कदाचित निवडणुकीलाही उभे राहतील. घराचा खोटा नंबर, मेलच फिमेल केलं, बंगला कुठलाही टाकला, आणि अधिकारी सगळं डोळेझाक करून मंजूर करतात ही वस्तुस्थिती आहे.
ते पुढे म्हणाले डोनाल्ड ट्रम्पसारखं बनावट कार्ड बनवून टाकलं जातंय, मग नक्की मतदार याद्या कोण तयार करतोय? आम्हाला डिजिटल मतदार याद्या हव्या आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे.”
रोहित पवार यांनी सरकारवर आरोप केला की, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अचानक मतदारसंख्या वाढली, हे डोनाल्ड ट्रम्प तात्यांसारख्या बनावट नोंदींमुळेच झाले असल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणानंतर विरोधकांकडून निवडणूक आयोग आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
#DonaldTrump #RohitPawar #FakeAadhaar #KarjatRashin #MaharashtraPolitics #VoterListScam #ElectionCommission #NCPSharadPawar #LocalBodyElections #MaharashtraNews