देशभरात तब्बल ₹6.05 लाख कोटींची विक्रमी उलाढाल
नवी दिल्ली : दिवाळी 2025 मध्ये देशभरात झालेल्या विक्रमी व्यापारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या संघटनेच्या अहवालानुसार, यंदाच्या दिवाळीत देशभरात तब्बल ₹6.05 लाख कोटींचा व्यापार झाला आहे. यामध्ये ₹5.40 लाख कोटींचा वस्तू व्यापार आणि ₹65,000 कोटींचा सेवा व्यापार समाविष्ट आहे. हा आकडा भारतीय व्यापारी इतिहासातील सर्वात मोठा उत्सवी व्यवहार मानला जात आहे.
CAIT चे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांच्या मते, मागील वर्षीच्या (₹4.25 लाख कोटी) तुलनेत यंदा व्यापारात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये 85 टक्के योगदान पारंपरिक आणि गैर-कॉर्पोरेट बाजारांचे राहिले आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची आणि स्थानिक बाजारांची मजबूत पुनरागमनाची झलक दिसून आली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘स्वदेशी दिवाळी’ अभियानाचे खरे ब्रँड अॅम्बेसेडर ठरले आहेत.” यंदा 87% ग्राहकांनी भारतीय वस्तूंना प्राधान्य दिले असून चिनी उत्पादनांच्या विक्रीत मोठी घट झाली ते सांगण्यात येत आहे.
CAIT च्या अहवालानुसार, विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या विक्रीचे प्रमाण असे आहे किराणा आणि FMCG: 12% सोने–चांदी: 10% इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स: 8%
कन्झ्युमर ड्युरेबल्स: 7% रेडीमेड कपडे: 7% गिफ्ट आयटम्स: 7% होम डेकोर: 5%फर्निचर व फर्निशिंग: 5% मिठाई व नमकीन: 5% वस्त्र उद्योग: 4% पूजन सामग्री: 3% फळे व सुके मेवे: 3% बेकरी व कन्फेक्शनरी: 3% फुटवेअर: 2% इतर वस्तू: 19%
सेवा क्षेत्रातही तब्बल ₹65,000 कोटींचा व्यापार झाला. यात पॅकेजिंग, ट्रॅव्हल, इव्हेंट मॅनेजमेंट, टेंट डेकोरेशन, हॉस्पिटॅलिटी, टॅक्सी सेवा आणि डिलिव्हरी नेटवर्क या क्षेत्रांचा समावेश आहे. यामुळे उत्सवी अर्थव्यवस्थेचा व्याप आणखी वाढला आहे.
“जीएसटी दरांचे तर्कसंगतरण उपभोक्त्यांच्या मागणीत वाढ करण्यास प्रभावी ठरले आहे.” सर्वेक्षणानुसार 72% व्यापाऱ्यांनी मान्य केले की, विक्री वाढीचे मुख्य कारण जीएसटी सवलत आहे. ग्राहकांनीही किमती स्थिर राहिल्याने समाधान व्यक्त केले आहे.
यंदाच्या दिवाळी व्यापारामुळे सुमारे 50 लाख तात्पुरते रोजगार निर्माण झाले आहेत. ग्रामीण व अर्ध-शहरी भागांचा व्यापारातील वाटा 28% इतका राहिला, ज्यातून ग्रामीण भारताच्या आर्थिक सशक्तीकरणाचे संकेत मिळतात.
