BCCIचा कडक इशारा “एशिया कपची ट्रॉफी भारताला सुपूर्द करा”

                                             

मोहसिन नकवी प्रकरण ICC पर्यंत जाण्याची शक्यता

नवी दिल्ली : एशिया कप 2025 (Asia Cup 2025) च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत विजेतेपद पटकावलं. मात्र, सामना संपल्यानंतर सुरू झालेल्या ट्रॉफी वादानं आता गंभीर वळण घेतलं आहे.

 भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) चे प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अध्यक्ष मोहसिन नकवी यांना ई-मेलद्वारे कडक शब्दांत पत्र पाठवत “एशिया कपची ट्रॉफी भारताला सुपूर्द करा” असा इशारा दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, BCCI ने आपल्या मेलमध्ये नमूद केलं आहे की, जर ACC कडून तात्काळ प्रतिसाद मिळाला नाही, तर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) नेण्यात येईल.

एशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर मोहसिन नकवी हे ACC प्रमुख म्हणून ट्रॉफी वितरण समारंभात उपस्थित होते. मात्र, भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. भारतीय खेळाडूंनी स्पष्ट केलं की ते ट्रॉफी ACC मधील इतर अधिकाऱ्यांच्या हातून घ्यायला तयार आहेत, 

पण नकवींकडून नाही. परिणामी, ट्रॉफी वितरण सोहळा रद्द करण्यात आला आणि नकवी यांनी ट्रॉफी व पदकं स्वतःसोबत नेली. नंतर ही ट्रॉफी ACC मुख्यालयात ठेवण्यात आल्याचं समजतं.

यानंतर या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला. BCCI आता भारताने जिंकलेली ट्रॉफी औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात यावी, अशी मागणी करत आहे. 

BCCI च्या मेलमध्ये म्हटलं आहे की, “टीम इंडियाने मैदानात परिश्रम करून ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे ती भारताला देणं हा ACC चा कर्तव्य आहे.”

एशिया कप 2025 दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वातावरण ताणलेलं होतं. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास टाळाटाळ केली होती, तर पाकिस्तानी खेळाडूंनी वारंवार ‘6-0’ चे इशारे करत “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान सहा भारतीय फायटर जेट्स पाडल्याचा खोटा दावा पुन्हा केला होता.

गौरतलब आहे की, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन वेळा सामना झाला आणि तिन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. आता हा ट्रॉफी वाद भारत-पाक क्रिकेटीय तणावाला आणखी धार देणारा ठरू शकतो.

#BCCI, #Asia Cup 2025, #मोहसिन नकवी, #ACC, #PCB,#टीम इंडिया, #ICC, #भारत विरुद्ध पाकिस्तान, #ट्रॉफी वाद, #क्रिकेट बातम्या, #एशिया कप फायन Mohsin Naqvi, #Team India, #India vs Pakistan, #Trophy Controversy, #Asia Cup Final, #Shigra Mail, #Cricket News

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने