यवतमाळ: यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांची जंत्री पोलीस अधीक्षकांकडे आहे गल्लीबोळात जन्माला येणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांची इत्थंभूत माहितीही आहे. मात्र गत काही महिन्यांपासून गुन्हेगारांवर वाचक निर्माण करू शकणारे अधिकारी व कर्मचारी अडगळीत गेले आहेत.आपल्याला काय करायचे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्याचाच फायदा घेतला जात आहे.त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करीत आहे. आशात जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सर्व गुन्हेगारांची जंत्री बाहेर काढण्याचे आदेश सर्व ठाणेदारांना दिल्याची माहिती आहे.
नव्वदच्या दशकात अतिशय शांत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यासह जिल्ह्यात गुन्हेगारीची चांगलीच फोफावली आहे. अगदी शिल्लक कारणातून रक्तपात घडविल्या जात आहे. आता तर खुन्नस काढण्यासाठी चक्का देशी कट्टा काढला जात आहे. ग्रामीण भागातील देशी कट्टे पोहोचले असताना पोलीस प्रशासनाकडून जप्तीची कारवाई केली जात आहे.
जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी लक्ष केंद्रित केल्याने गुन्हेगारांमध्ये देखील एक प्रकारचं दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात रंगत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response