यवतमाळ : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख आणि वणीचे आमदार संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात दि.२६ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेत दि.९ मे. रोजी सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची सरकारला आठवण करून देण्यासाठी शिवसेना ठाकरे या पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी यवतमाळ शहरातून भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार होते.याची तयारी देखील जवळपास महिनाभरापासून सुरू होती.
अशात भारत - पाक युद्ध सुरू आहेत.युद्धजन्य परिस्थितीत देशाचे जवान आणि सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याच्या दृष्टिकोनातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय देशमुख आणि आमदार संजय दरेकर यांना भ्रमणध्वनीवरून मोर्चा रद्द करण्याचे आदेश देत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रसिद्धी पत्रक काढून मोर्चा रद्द करत असल्याचं माध्यमांच्या प्रतिनिधींना कळवलं त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या वतीने या निर्णयाचं स्वागत केल्या जात आहे.
राज्य सरकारने दिलेल्या वचनाची आठवण करून देण्याकरिता व शेतकऱ्यांना आधार देण्यासाठि दि.९ मे. ला भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा पूर्वनियोजित होता. याकरिता शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत प्रमुख्याने हजर राहणार होते. परंतु देशापेक्षा कोणतेही मोठे कार्य नाही,सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हा पूर्वनियोजित मोर्चा स्थगित करीत असल्याचं प्रसिद्धी पत्रातून कळविले आहे. सध्या देश एक वेगळ्या स्थित्यंतरातून जात आहे.देशातील सैन्य,अर्धसैनिक दल, राज्य राखीव दल, पोलीस बांधव यांना सज्ज राहणे अती आवश्यक आहे.त्यांना इतर कोणत्याही ताण येऊ नये आणि देश कर्तव्यासाठी आपण सर्व त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे हे आंदोलन स्थगित करीत असल्याचे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे.