Breaking

Post Top Ad

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

'प्रियांका मोघेंनी विरोधकांचा वाढविला टेन्शन'

'प्रियांका मोघेंनी विरोधकांचा वाढविला टेन्शन'


महाराष्ट्र24 : यवतमाळ,आर्णी विधानसभा मतदारसंघात दुहेरी लढत होणार हे स्पष्ट झाले असतांना महाविकास आघाडी व काॅग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या सौभाग्यवती प्रियंका मोघे सध्या मतदारसंघातील मतदारांची भेटीगाठी घेतांना पाहायला मिळतेय.प्रियंका मोघे प्रचाराच्या मैदानात उतरल्याने जितेंद्र मोघेंना याचा फायदा होणार असल्याची चर्चा आहेत.

'प्रियांका मोघेंनी विरोधकांचा वाढविला टेन्शन'


जितेंद्र मोघे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.नविन चेहरा म्हणून मोघेंकडे बघितल्या जातेय.मोघे परिवारातील सगळेच जण सध्या प्रचाराच्या मैदानात उतरले असून यात मतदारसंघात लक्षवेधी ठरतेय ते म्हणजे जितेंद्र मोघे यांच्या पत्नी प्रियंका मोघे.मोघे घरण्याची सून मतदारसंघातील मतदारांची भेटीगाठी देण्यावर भर देत असल्याने विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं टेन्शन वाढलंय.
'प्रियांका मोघेंनी विरोधकांचा वाढविला टेन्शन'



माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी अनेक दशकांपासून राजकारणातून मतदारसंघासह जिल्ह्याचं नेतृत्व केलं.यंदाच्या निवडणुकीत शिवाजीराव मोघेंनी मुलगा आणि काॅग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले असून महाविकास आघाडीचे सगळे घटकपक्षातील सर्वच नेते मंडळी जोरदार काणाला लागल्याचे पाहायला मिळत.मोघेंना वाढता पांठीबा बघता त्यांच्या पत्नी प्रियंका मोघे देखील प्रचाराच्या मैदानात उतरल्याने काॅग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघेंना मोठा फायदा होणार असल्याचे बोलल्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad