महाराष्ट्र24 । मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात हनुमान चाळीसा हा विषय प्रचंड चर्चेला जात आहे.अशात अभिनय करण्यात सुप्रसिद्ध असलेले राणा दाम्पत्य प्रसिद्धी मिळवण्यासाठी चक्क राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या निवास्थान असलेले 'मातोश्री'वर हनुमान चाळीसा वाचण्याचा हट पकडलाय.
आता प्रश्न अशा उपस्थित होतेय की,हनुमान चाळीसा पठण करायचा असेल तर हनुमान मंदिरासमोर करायला हव.मातोश्री ची नौटंकी कशासाठी? वाय दर्जाची सुरक्षा मिळाल्यानंतर स्टंट बाजी चा हा पहिल्याचा प्रयोग राणा दाम्पत्यांनी केला.
मातोश्रीवर हनुमान चाळीसा वाचणारच असा हट्ट त्यांचा आहे.मात्र हा राणा आणि शिवसेनेत संषर्घ वाढण्याची शक्यता आहे.मुंबईत शिवसैनिक सक्षम असल्याने राणा दाम्पत्यांना ते धडा शिकवतील अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार यांनी त्यांच्या मतदार संघातील विकास कामे सोडून हनुमान चाळीसा चा मुद्दा हाती घेतल्याने मतदारांमधून नाराजी उमटत आहे.तर या मागे भाजप असल्याचा आरोप शिवसेनेकडून होत आहे.एकंदरीत राणा दाम्पत्यामागे कोण हे कोणाला सांगण्याची आवश्कता वाटत नाही.
