Breaking

Post Top Ad

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

येथे बघता येईल आपल्याला बारावीचा निकाल | HSC Result 2021

HSC Result 2021


अखेर इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज दि. ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी वाजता निकाल ( HSC Result 2021 ) जाहीर होणार आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षा गायकवाड यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली.  

 

बोर्डाकडून निकालासाठी अधिकृत संकेतस्थळांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. आपला आसन क्रमांक आईचे नाव निकाल पाहण्यासाठी आवश्यक असणार आहे.  

 

इयत्ता 10 वी च्या निकालावेळी वेबसाईटचे सर्वर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहतांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी खबरदारी घेऊन बोर्डाने नियमित संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध करून दिला आहे.


कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळा   महाविद्यालये बंद होती. ऑनलाईन पद्धतीने मुलांना शिक्षण घ्यावे लागले असले तरीही कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.  

 

तर दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारावर तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर बारावीचे गुण ठरवण्याचा फॉर्म्युला सरकारने काढला होता. त्याच निकषानुसार आता बारावीचा निकाल लावण्यात आला आहे.

 

इयत्ता १२ वी चा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळांची यादी 

HSC Result Website List Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad