बेंगलोर पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
महाराष्ट्र24 । आर्णी : समाज माध्यमाचा दुर उपयोग करून मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील विवाहीत दत्ता हिरामण राठोड नामक भामट्याने कर्नाटक राज्यातील बेंगलौर येथील अल्पवयीन मुलीला प्रेमात ओढले आणि त्याला नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे बोलविले मात्र आरोपी दत्ता ला माहूर मध्ये ओळखत असल्याने त्याने पिडीत मुलीला आर्णी येथील मारीया सलमान खान हिच्या घरी आणले.
गुरूवार पासून ते दोघे मारीया च्या घरी एकाच खोलीत राहत असल्याने आर्णी पोलीसांना संशय आल्याने त्यांनी रविवारी दोघांना पोलिस स्टेशन मध्ये बोलावून विचारपूस केली असता पिडीत अल्पवयीन मुलीने सत्य बोलून दाखविल्याने पोलीसांनी बेंगलौर पोलिसांसोबत संपर्क करून त्यांना माहिती दिली.
बेंगलौर शहरातील १६ वर्षाच्या मुली सोबत फेसबूक वर फेक ऑकांऊट बनवून त्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मैत्री केली.नंतर मला तुझ्याशी प्रेम झाले आहे. तुझ्या विना मी जिंवत राहू शकत नाही असे म्हणुन त्या पिडीत मुलीला बेंगलौर वरून नागपूर मार्ग माहूर ला बोलविले. माहूर वरून ते दोघे आर्णी येथील मारीया खान यांच्या घरी तीन दिवस एकाच खोळीत थांबले.
दरम्यान अल्पवधी मुलीवर दत्ता राठोड याने अत्याचार केल्याचे पिडीत मुलीने पोलिसांना सांगितले. बेंगलौर शहर पोलीस स्टेशन मध्ये किटनाॅफ केल्याचा गुन्हा दाखल आहेत. सोमवारी दुपारी दरम्यान आर्णी पोलीसांच्या मदतीने मारीया खानच्या घरातून बेंगलौर पोलिसांनी महिले सह पिडीत मुलगी आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले.
वैधकिय तपासणी केली असता पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. मानवी तस्करी करणारी टोळी सक्रीय असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून नांदेड जिल्ह्यातील आरोपी दत्ता हा आर्णी येथील मारीया खान हिच्या घरी पिडीत अल्पवयीन मुलीला कशा आणलाय अशा प्रश्न उपस्थिती केल्या जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response