महाराष्ट्र24 । यवतमाळ राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड जिल्ह्यात दमदार एण्ट्री करणार आहेत.
वनमंत्री पद गेल्या पासून आमदार संजय राठोड हे संपूर्ण राज्याचा दौरा करित आहेत. त्यांच्या दौऱ्या समाजातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालाय. आमदार राठोड यांनी मुंबई,पालघर आणि ठाणे पासून दौऱ्याला सुरूवात केली. त्यानंतर टप्या टप्याने ते संपुर्ण राज्यात दौरा केलाय.
आमदार संजय राठोड यांचा दौरा अंतिम टप्यात असून येत्या १ ऑगस्ट पासून ते यवतमाळ जिल्ह्याचा दौऱ्याला करणार आहेत. दि.१ ऑगस्ट ला सकाळी ११ वाजता ते आर्णी येथे समाजातील नागरिकांसोबत संवाद साधणाल असून त्यानंतर पांढरकवडा, घाटंजी येथील समाजातील नागरिकांसोबत चर्चा करणार आहे.
संपूर्ण राज्याचा दौरा केल्या नंतर आता जिल्ह्यात दौरा करित असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आमदार संजय राठोड ह्यांना पुन्हा मंत्री दिल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राठोड संपुर्ण राज्याचा दौरा करित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.