Breaking

Post Top Ad

मंगळवार, २७ जुलै, २०२१

'श्रमिक पत्रकार संघटनेचे तरूण कार्ड'

'श्रमिक पत्रकार संघटनेचे तरूण कार्ड'


महाराष्ट्र24 यवतमाळ पत्रकार संघटनेच्या इतिहासात प्रथमच यवतमाळ श्रमिक पत्रकार संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची अविरोध निवड करण्यात आली. यात झी२४तासचे  श्रीकांत राऊत अध्यक्ष तर लोकमतचे उपसंपादक सुरेंद्र राऊत यांची सचिव आणि गणेश खडसेंची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.


श्रमिक पत्रकार संघटना यवतमाळ मधील सर्वात मोठी संघटना म्हणुन ओळख आहेत. अशात दि.२५ जुलै रोजी श्रमिक पत्रकार संघाची आमसभा पार पडली. यात सर्व यंग आणि होतकरू पत्रकारांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.


श्रीकांत राऊत, सुरेंद्र राऊत आणि गणेश खडसे, मयुर वानखडे, भास्कर मेहरे, अंकुश वानखडे आदी पत्रकारांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे बिनविरोध निवड झालेले पदाधिकारी हे तरूण आहेत. श्रमिक पत्रकार संघटनेत ८५ टक्के पत्रकार तरूण आहेत. त्यामुळे यावेळी बिनविरोध तरूण पत्रकारांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकारी पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. तसेच पत्रकार भवन करिता लवकरच लोकप्रतिनिधींशी चर्चा करून समस्या निकाली काढणार असल्याचे समजते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad