संजय राठोड मंत्री व्हावे यासाठी सायकल वारी

संजय राठोड मंत्री व्हावे यासाठी सायकल वारी

महाराष्ट्र24यवतमाळ: गंमीर आरोप झाल्या नंतर माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


यवतमाळ येथील ५३ वर्षीय शिवसैनिक गिरीष व्यास हे मुंबई येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जावून राठोड मंत्री व्हावे यासाठी साकडं घालणार आहेत.


गिरीष व्यास हे या आधी देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी यवतमाळ ते तुळजापुर असा प्रवास करून आई तुळजा भवानी ला साकडं घातले होते.


आमदार संजय राठोड यांची पुन्हा मंत्री मंडळात वर्णी लागावी यासाठी शिवसैनिक गिरीष व्यास यवतमाळ ते मुंबई असा सायकलने प्रवास करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर नतमस्तक होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राठोड संदर्भात निवेदन देणार आहे.दरम्यान यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे आणि राजेंद्र गायकवाड यांनी व्यास यांना हिरवी झेंडी दाखवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने