महाराष्ट्र24 | यवतमाळ : शिवसेनेचे आमदार संजय राठोड ह्यांच्या झालेल्या आरोपानंतर त्यांची लोक प्रियता कमी होईल असे विरोधकांना वाट होते.
मात्र झाले उलटे काळ दिग्रस येथील गवळी पुरा मध्ये असंख्य मुस्लिम समाजातील युवकांनी सेनेत प्रवेश घेतला. अक्षरश: संजय राठोड यांना पाहण्यासाठी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती.
आमदार संजय राठोड यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत जल्लोष मध्ये त्यांचा स्वागत करण्यात आला. सध्या नगर पालिकेच्या निवडणूक तोंडावर आहे. त्या दृष्टीने दिग्रस शहरातील असंख्य मुस्लिम समाजातील युवकांनी संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्तितीत सेनेत प्रवेश केला.
काल झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमामुळे विरोधकांना मोठो धडकी घेतल्याचे बोलल्या जात आहे.आमदार संजय राठोड यांनी हिंदीतून भाषणं सुरु केलं. यावेळी आमदार संजय राठोड यांनी शेर शायरीतून विरोधकांना चांगलेच सुनावले.