'यवतमाळ मध्ये गोळ्या झाडून हत्या'

'यवतमाळ मध्ये गोळ्या झाडून हत्या'


महाराष्ट्र24 । यवतमाळ: शहरात बुधवारी रात्री उशीरा दरम्यान गुन्हेगारी टोळ्यातील वाद चव्हाट्यावर आल्याने भर रस्त्यावर गोळ्या झाडून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.


गुन्हेगारी जगातील चमकता सितारा अक्षय राठोड यांनी रेतीच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती मजबूत केली आहे. अक्षय राठोड यांच्या बहिणीशी मृतक करण परोपटे यांचा विवाह झाला. त्यामुळे तो कौटुंबिक सदस्य म्हणुन अक्षय राठोड यांचे सर्व काम पाहत होता.

'यवतमाळ मध्ये गोळ्या झाडून हत्या'

घटनास्थळी पाहणी करतांना पोलीस 

शहरातील गुन्हेगारी वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याने स्टेट बॅक चौकात करण परोपट वर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अतिशय निर्दयीपणे रात्री दरम्यान गोळीबाराची ही घटना घडली. यात मृतक करण परोपटे यांच्यावर गोळ्या झाडल्या, यातील तीन गोळ्या पोटावर तसेच पाठीवर लागल्या. त्या नंतर आरोपींनी धारदार चाकूने सपासप वार केले.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने