महाराष्ट्र24 । आर्णी,यवतमाळ: सतत या-ना त्या चर्चेत राहणारी नगर परिषद म्हणुन आर्णी नगर परिषद ओळखली जाते. आज पुन्हा मनसेच्या अनोख्या आंदोलनामुळे नगर परिषद चर्चेत आली. निमित्त होतं पाणी पुरवठा त्वरीत मार्गी लावण्याच्या मागणी साठी गोट्या खोलो आंदोलन.
आर्णी पालिकेला शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. मात्र नगर परिषदेने अद्यापही पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न न केल्याने 'ती' पाणी पुरवठा योजना परत जाण्याच्या मार्गावर आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने पालिकेच्या अंगणात आगळे वेगळे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मनसेंनी केला.

