Breaking

Post Top Ad

शनिवार, २० मार्च, २०२१

'कोरोना पुन्हा झाला सक्रिय'

'कोरोना पुन्हा झाला सक्रिय'
यवतमाळ: आज दि.२० मार्च रोज शनिवारी गेल्या 24 तासात सहा कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला असून 471 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तर कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटर येथे भरती असलेल्या 611 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 42 वर्षीय पुरुष आणि 65 वर्षीय महिला, दिग्रस शहरातील 85 वर्षीय पुरुष ,दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरूष, पुसद तालुक्यातील 65 वर्षीय महिला आणि घाटंजी येथील 83 वर्षीय पुरूष आहे.

दर रविवार 'महाराष्ट्र24'वर वाचा राजकीय नेत्यांची पडद्या मागची विशेष बातमी

शनिवारी पाॅझिटिव्ह आलेल्या 471 जणांमध्ये पुरूष 327 आणि 144 महिला आहे.यामध्ये यवतमाळ 242, दिग्रस 46, उमरखेड 32, दारव्हा 27, पुसद 26, बाभुळगांव 25 आर्णी 23, नेर 17, पांढरकवडा 13, राळेगांव 6, घाटंजी 5, वणी 5, महागांव 1 आणि इतर ठिकाणचे 3 रूग्ण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad