Breaking

Post Top Ad

गुरुवार, ११ मार्च, २०२१

जिल्हाधिकारी सिंह यांनी ह्या संदर्भात दिले आदेश

जिल्हाधिकारी सिंह यांनी ह्या संदर्भात दिले आदेश
यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मृत्युचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रुग्णांचा सरासरी दर हा 13.85 आहे. त्यामुळे हा दर कमी करायचा असेल तर जिल्ह्यात रोज पाच हजार टेस्टिंग होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सर्व तालुकास्तरीय समितीला आरटीपीसी,आररॅपिड ॲन्टीजन टेस्टिंगचे उद्दिष्ट निर्धारीत करून दिले आहे.


जिल्ह्यात गुरूवारी दि.११ मार्च रोजी सहा जणांचा मृत्युसह 382 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 222 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.


जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटीव्ह रुग्णांचा दर हा यवतमाळचा असून तो 31.70 असल्यामुळे रोज किमान 1000 चाचण्या करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यानंतर दिग्रस (दर 20.38)  चाचण्या 850, पुसद (दर 16.69)  चाचण्या 650, दारव्हा (दर 10.15)  चाचण्या 450, नेर (दर 10.28)  चाचण्या 350, बाभुळगाव (दर 9.72)  चाचण्या 250, उमरखेड (दर 9.99)  चाचण्या 200, केळापूर (दर 5.55)  चाचण्या 200, घाटंजी (दर 9.13)  चाचण्या 200, वणी (दर 7.81)  चाचण्या 190, आर्णी (दर 12.04)  चाचण्या 170, महागाव (दर 7.34)  चाचण्या 140, राळेगाव (दर 4.87)  चाचण्या 130, कळंब (दर 3.52)  चाचण्या 80, मारेगाव (दर 3.94)  चाचण्या 80 आणि झरीजामणी तालुक्याचा पॉझिटीव्ह दर 2.13 असून 60 चाचण्या रोज करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.


लसीकरणासंदर्भातही सुचना

जिल्ह्यात ज्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे, अशा प्रत्येक केंद्रात दिवसाला किमान 100 लसीकरण करण्यात यावे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर रोज किती जणांना लस देण्यात आली, त्याचा नियमित अहवाल प्रशासनाला सादर करावा. कोरोनाबाधित ज्या रुग्णाला गृह विलगीकरणाची सुविधा देण्यात आली आहे, त्या नियमाचे पालन संबंधितांकडून होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून कोरोनाबाधित रुग्णावर नियंत्रण ठेवावे. सुचनांचे पालन न करणा-यांवर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.


याकरीता जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठानांमधील कर्मचारी, शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी, कोरोना स्प्रेडर जसे दुध, भाजी, वृत्तपत्रे विक्रेते, पोष्टमन, घरोघरी जाऊन साहित्य विक्री करणारे व इतर घरपोच  साहित्य विक्री करणारे, आठवडी बाजार व घाऊक भाजीमंडीमधील विक्रेते, फळ विक्रेते, आद्योगिक कारखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, तसेच गर्दी होण्याची संभावना ज्या ठिकाणी जास्त असते, अशा ठिकाणी आरटीपीसीआर / रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात यावी. प्रत्येक तालुक्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याकरीता महसूल, पोलिस, आरोग्य, पंचायत तसेच इतर विभागांनी समन्वयातून काम करावे. तसेच जिल्ह्यातील जी प्रतिष्ठाने चालू करण्याकरीता परवानगी देण्यात आली आहे, अशा प्रतिष्ठानांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची टेस्ट करणे बंधनकारक आहे. ज्या प्रतिष्ठानांमध्ये टेस्टिंग होणार नाही, त्यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad